Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New pay Commission New Update News ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची नविन मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर आली आहे , ती म्हणजे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत वेतन आयोग समितीचे गठण मोदी सरकारकडून करण्यात येणार आहे .
लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेश , महाराष्ट्र , केरळ अशा मोठ्या राज्यांमध्ये अपयश मिळाले आहेत , यांमध्ये कर्मचाऱ्यांचा रोष देखिल कारणभुत ठरले आहेत . यामुळेच देशांमध्ये आगामी काळांमध्ये काही राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची भेट केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे .
नव्याने स्थापन झालेल्या केंद्र सरकारला एनडीए मधील काही निर्वाचित तसेच अपयशी झालेल्या सदस्यांनी सल्ला दिला आहे , कि सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पुर्ण करावेत , कर्मचाऱ्यांचा रोषाचा विपरीत परीणाम निवडणुकींमध्ये होत असल्याचे कबुली एनडीएच्या पुढाऱ्यांकडून करण्यात येत आहेत .
यांमध्ये प्रामुख्याने नविन वेतन आयोगाची प्रतिक्षा सरकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत . सन 2026 मध्ये नविन वेतन आयोग लागु होणे अपेक्षित आहेत , तर त्या अनुषंगाने पुर्व कामकाजाकरीता वेतन आयोग समितीची स्थापना यंदाच्या वर्षी होण्याची मोठी चर्चा सध्या मिडिया रिपोर्ट मध्ये सुरु आहे . केंद्र सरकार कडून दर दहा वर्षांनी वेतन आयोगांमध्ये सुधारणा करण्यात येते , सन 2016 मध्ये सहावा वेतन आयोग लागु करण्यात आलेला होता , तर आता दहा वर्षांनी म्हणजेच सन 2026 मध्ये नविन वेतन आयोग ( 8TH Pay Commission ) लागु करण्यात येणार आहे .
पगारांमध्ये किती वाढ होईल ? : केंद्रीय कामगार युनियन मार्फत पगारांमध्ये 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे नविन वेतन आयोग लागु करण्यात यावा अशी आग्रही मागणी आहे , यानुसार पगारवाढ केल्यास , केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मुळ वेतनांमध्ये 18 हजार रुपयांवरुन 26 हजार रुपये अशी वाढ होईल , तर महाराष्ट्र राज्यातील किमान मुळ वेतनांमध्ये 15 हजार रुपयांवरुन 21 हजार रुपये अशी वाढ होईल .
नविन वेतन आयोग समितीची स्थापना कधी होईल ? : नविन वेतन आयोग समितीची स्थापना यंदाच्या वर्षी होणे आवश्यक आहेत , यामुळे याबाबत केंद्रीय स्तरावर लवकरच निर्णय होण्याची चर्चा सध्या मिडीया रिपोर्टमध्ये मोठ्या प्रमाणात सुरु आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.