Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai Bhatta vadh news ] : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 4 टक्के वाढ करणेबाबत , राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहेत . सदर बैठकीमध्ये राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना वाढीव डी.ए लागु करण्यात येणार आहे .

देशांमध्ये काल दिनांक 09 जुन पासून खऱ्या अर्थाने आचारसंहिता उठली आहे , यामुळे राज्यातील विविध प्रलंबित कामे पुर्ण करण्यासाठी राज्य सरकारची कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतले जाणार आहेत . यांमध्ये राज्यातील शेतकरी , कर्मचारी , निवृत्तीवेतनधारक , इतर विविध प्रलंबित असणाऱ्या बाबींवर निर्णय घेतले जाणार आहेत .

महागाई भत्ता वाढीचा होणार निर्णय : राज्य शासन सेवेतील सरकारी , निमशासकीय ( जिल्हा परिषद ) कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक 01 जानेवारी 2024 पासुन 4 टक्के डी.ए वाढ लागु करणेबाबत , निर्णय घेतला जाणार आहे , यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना एकुण 50 टक्के प्रमाणे डी.ए वाढ होईल .

माहे जुन पेड जुलै वेतन / पेन्शन देयकासोबत मिळणार वाढीव डी.ए : माहे जुन पेड इन जुलै वेतन / पेन्शन देयकासोबत कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के डी.ए चा प्रत्यक्ष लाभ दिला जाईल , अशी माहिती समोर येत आहेत , तर माहे जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीमधील डी.ए फरकाची रक्कम जुन वेतनासोबत अदा केली जाईल .

कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठक : जुन महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक आयोजित केली जाणार असून , यांमध्ये विविध प्रलंबित बाबींवर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे , यांमध्ये कर्मचाऱ्यांचा प्रलंबित डी.ए बाबत अधिकृत्त निर्णय घेतला जाईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *