Herbicide Price : ऐन पेरणीच्या वेळी तणनाशकांच्या किंमतीत वाढ ; शेतकऱ्यांच्या खिश्याला कात्री !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Herbicide Price increase News ] : ऐन पेरणीच्या वेळी तण नाशकांच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे , यामुळे शेतकऱ्यांच्या खिश्याला कात्री लागणार आहे , तर पीक उत्पादन खर्चांमध्ये देखिल वाढ होईल . तणनाशकांची किंमती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

सध्या राज्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची बियाणे , खते , तणनाशक औषधे खरेदी करण्याची मोठी लगभग सुरु झालेली आहे . अर्थशास्त्राच्या नियमांनुसार मागणी वाढली कि , किंमत वाढते अशा नियमाप्रमाणे सध्या तण नाशक औषधांची मागणी वाढल्याने , किंमतीमध्ये कंपन्याने वाढ केली आहे .

या किंमत वाढीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ होणार आहे . यंदाच्या वर्षी चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आल्याने , शेतकऱ्यांकडून पीक उत्पादन खर्चासाठी हयगय करताना दिसून येत नाहीत . परंतु तण नाशकांच्या किंमत वाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ नाराजगी दिसून येत आहे .तण नाशकांची किंमती पुढीलप्रमाणे असतील .

तणनाशकाचे नावनविन किंमत ( प्रति लिटर दर )
ग्लायसिल350-450/-
परसुट1100-1350/-
सरगा सुपर1350-1400/-
साकेत800-850/-

तणनाशक औषधांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने , शेतकऱ्यांच्या पीक उत्पादन खर्चावर थेट परिणाम होणार आहे . यामुळेच शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजगी दिसून येत आहे , सरकारकडून खताच्या किमती स्थिर असावेत याकरिता सरकारने देशामध्ये सर्वसामान्य पिकांकरिता वापरण्यात येणाऱ्या खतावर सबसिडी जाहीर केल्याने , खतांच्या किमती स्थिर आहेत . परंतु तणनाशक औषधांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांकडून नाराजगी व्यक्त केली जात आहे .

Leave a Comment