Fertilizers Rate 2024 : पेरणीसाठी खतांचे नविन भाव ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Fertilizers Rate 2024 ] : राज्यांमध्ये काही ठिकाणी पेरणीसाठी जमीनीतील पुरेशी ओल झालेली असल्याने , शेतकऱ्यांची आता बियाणे , खते खरेदी करण्याची मोठी धावपळ सुरु झाली आहे . अशांमध्ये काही ठिकाणी खत , बियाणे महाग देण्याच्या तक्रारी समोर येत असतात .

परंतु सरकारच्या नविन धोरणांनुसार चालु वर्षांमध्ये रासायनिक खतांचे किमान व कमाल विक्रीचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत . ज्यामुळे शेतकऱ्यांची होणारी लुट आटोक्यात येईल . यासाठी शेतकऱ्यांनी देखिल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे . बियाणे , खतांची किंमत तसेच सदरचे बियाणे चालु वर्षातील आहे का नाही याची खात्री करणे आवश्यक असेल .

युरिया / डीएपी : आपल्या देशांमध्ये युरिया हे रासायनिक खत सर्वाधिक वापरले जाते , हे खत सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडावे याकरीता या खतावर 45 किलोग्रॅम गोणीवर तब्बल 2450/- रुपये इतकी सबसिडी दिली जाते . 45 किलोग्रॅम युरिया गोणीची किंमत ही 266.50/- रुपये इतकी आहे .युरिया नंतर देशांमध्ये डीएपी खताचा सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून अधिक होतो , यामुळे या खताचे 50 किलोग्रॅम गोणीची किंमत ही 1350/- रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे , ज्यावर सरकारकडून 4073/- रुपये प्रति गोण इतकी सबसिडी दिली जाते .इतर खतांचे ( दर हे 50 किलो गोणीचे असेल ) बाजारभाव पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

खताचे नावखताची किंमत ( प्रति 50 KG गोणीची )
DAP1350/-
एनओपी 0:0:60:01655/- ते 1700/-
एनपी 24:24:0:01500/- ते 1700/-
एनपीएस 24:24:0:081600/-
एनपीएस 20:20:0:131200/- ते 1400/-
एनपीके 10:26:26:01470/-
एनपीके 12:32:161470/-
एनपीके 14:35:141700/-
एनपी 14:28:01700/-
एनपी 20:20:0:01300/-
एनपीके 15:15:151470/-
एनपीएस 16:20:0:131150/- ते 1470/-
एनपीके 16:16:16:01375/-
एनपी 28:28:0:01700/-
एएस 20:5:0:0:231000/-
एनपीकेएस 15:15:15:091450/- ते 1470/-
एनपीके 17:17:171210/-
एनपीके 08:21:211800/- ( 40 कि.ग्रॅम )
एनपीके 09:24:241900/- ( 40 कि.ग्रॅम )
एसएसपी ( दाणेदार ) 0:16:0:11530/- ते 590/-
एसएसपी ( भुकटी ) 0:16:0:12490/- ते 550/-

Leave a Comment