राज्यात लोकसभा निवडणुकांमध्ये या 09 दिग्गजांचा झाला पराभव ; जाणून घ्या सविस्तर ..

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ loksabha election result update news ] : यंदाच्या राज्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये दिग्गजांचा मोठा पराभव होताना दिसुन आला आहे . राज्यातील लोकसभा निवडणूका 2024 चा पक्षनिहाय निकाल पाहिला असता तर , राष्ट्रीय काँग्रेसला सर्वाधिक 13 जागा मिळाल्या आहेत , तर भारतीय जनता पक्षाला 09 जागा तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 09 जागा मिळाल्या आहेत . तर शिवसेना ( शिंदे गटाला ) 07 जागा , राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) पक्षाला 08 जागा , तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार ) पक्षाला 01 जागा तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडूण आला आहे .

पंकजा मुंडे : राज्यातील मराठवाड्यतील बीड लोकसभा मदासंघातील दिग्गज उमेदवार पंकजा मुंडे यांचा अखेर 40 व्या फेरीत पराभव झाला आहे , त्यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाचे बजरंग बाप्पा सोनवणे यांनी केला , दोघांमध्ये देखिल काटेची टक्कर झाली होती ,या ठिकाणी दुबार मतमोजणी करण्यात आली . तर 40 व्या फेरीमध्ये बजरंग सोनवणे यांनी लिड घेवून विजय झाले .

रावसाहेब दानवे : जालना लोकसभा मतदार संघातुन सलग 5 वेळा ( सन 1999 पासुन सलग ) खासदार म्हणून निवडून आलेले रावसाहेब दानवे यांचा महाविकास आघाच्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांनी पराभव केला आहे .

भारती पवार : डॉ .भारती पवार ह्या केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री होते , त्यांचा कांदा भावामुळे तसेच कांद्याची निर्याद बंदी उठविणे इ.बाबीकरीता मोठा प्रमाणात जनतेकडून विरोध दर्शविण्यात आला . यामुळे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाचे भास्करराव भगरे सर यांचा मोठ्या मताने विजय झाला आहे .

सुभाष भामरे : भारतीय जनता पार्टीचे माजी केंद्रीय संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांचा धुळे लोकसभा मतदार संघातुन डॉ . शोभा बच्छाव यांनी पराभव केला . मागील 10 वर्षांपासुन धुळे लोकसभा मतदार संघाचे सुभाष बच्छाव खासदार होते .

नवनीत राणा : नवनीत राणा ह्या निवडणुकीच्या आधीपासुन वर्षभर मिडीयांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत होत्या , विजयाचे कल सर्व त्यांच्या बाजुने होते , परंतु काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणांचा मोठ्या मताने पराभव केला आहे .

संजयकाका पाटील : सांगली लोकसभा मतदार संघातुन विशाल पाटील या अपक्ष उमेदवारांचा विजय झाला असून , त्यांने भाजपाचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांचा मोठ्या मताने पराभव केला आहे .

सुधिर मुनगंटीवार : भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते ( माजी मंत्री ) सुधीर मुनगंटीवार यांचा काँगेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी पराभव केला आहे .

राहुल शेवाळे : ठाकरे गटाला सुरुंग लावणारे राहुल शेवाळे शिंदे गटाचे खासदारांचे गट नेते बनले होते , त्यांचा दक्षिण -मध्य मुंबई लोकसभा मतदासंघातुन अनिल देसाई यांच्याशी थेट लढत झाली , यांमध्ये राहुल शेवाळे यांचा मोठ्या मताने पराभव झाला .

हिना गावित : नंदुरबार मतदार संघाच्या विद्यमान खासदार हिना गावित यांचा काँग्रेसच्या गोपाल पाडवी यांनी मोठ्या मताने पराभव केला आहे .

Leave a Comment