Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Govt. Employee  benefit in jully Month ] : सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यांत दुहेरी लाभ मिळणार आहे , सरकारी कर्मचाऱ्यांना सदरचा लाभ    दरवर्षी लागु करण्यात येतो . यांमध्ये वार्षिक वेतनवाढ व महागाई भत्ताचा समावेश आहे .

सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी माहे जुलै महिन्यांत वार्षिक वेतनवाढ लागु करण्यात येते , त्याचबरोबर   वर्षातुन दोन वेळा महागाई भत्ता अनुज्ञेय करण्यात येतो . यांमध्ये माहे जानेवारी व जुलै  महिन्यात सदरचा डी.ए    AICPI च्या निर्देशाकानुसार महागाई भत्तांमध्ये वाढ लागु करण्यात येते . सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासुन 50 टक्के दराने डी.ए अनुज्ञेय करण्यात आलेला आहे .

सदरचा डी.ए राज्य कर्मचाऱ्यांना लागु करणे बाकी आहे , याबाबत लवकरच शासन निर्णय निर्गमित होणार आहे . केंद्रीय कर्मचाऱ्यांना परत एकदा डी.ए वाढ माहे जुलै मध्ये लागु करण्यात येईल , ज्यांमध्ये 3 ते 5 टक्के पर्यंतची वाढ होवू शकते , ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता मध्ये देखिल वाढ होईल .

सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी मुळ वेतनाच्या 3 टक्के वेतनवाढ होत असते . म्हणजेच डी.ए व वेतनवाढ एकाच वेळी होत असल्याने एकुण वेतनांमध्ये मोठी वाढ होते . यंदाच्या वर्षी निवडणुकांचे माहोल सुरु असल्याने , सरकार कडून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित बाबींवर तात्काळ निर्णय घेतले जाते आहेत .

कर्मचारी संघटनांकडून सरकारला दिलेल्या निवेदनानुसार , वेतनवाढ ,डी.ए वाढ विधीत कालावधीमध्ये लागु करण्याची मागणी करण्यात आलेली आहे .यंदा निवडणुकांमुळे सदरचे लाभ विहीत कालावधीत लागु होण्याची कर्मचाऱ्यांना आशा आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *