Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee old Pension & New Pay Commission ] :  मिडिया रिपोर्टनुसार देशांमध्ये महायुतीची सत्ता स्थापन होण्याची संभावना अधिक असेल , परंतु महायुतीला सन 2014 व 2019 प्रमाणे जागा मिळण्याची संभावना कमी आहे . उद्या लोकसभा निवडणूका 2024 चा निकाल जाहीर होणार आहे .

जर देशांमध्ये महायुतीची सत्ता मोठ्या मताध्याक्याने स्थापन झाल्यास , कर्मचाऱ्यांच्या बाजुकडे दुर्लक्ष होईल , तर सत्ता जर जेमतेम संख्याबळ मिळाल्यास , कर्मचाऱ्यांच्या मागणींचा विचार केला जाईल .कारण देशांमध्ये कर्मचारी वर्ग संघटीत आहे , कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन , नविन वेतन आयोगाच्या मागणीसाठी देशात संघटित पणे आंदोलन केले होते , तसेच Vote For OPS असा नारा देखिल देण्यात होता .

महायुती सरकारकडून जुनी पेन्शन बाबत केंद्रात उचित निर्णय घेतला नाही , यामुळे महायुती सरकारला कर्मचारी वर्गांचा पाठिंबा कमी होता , याचे रिझल्ट उद्या दिसूनच येईल . जर देशांमध्ये महायुतीची सत्ता स्थापन झाल्यास त्यांच्यावर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना त्याचबरोबर नविन वेतन आयोग ( New Pay Commission ) लागु करण्याचा अधिक दबाव असेल .

राष्ट्रीय काँग्रेसच्या जाहीरनाम्यांमध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा अंतर्भाव असल्याने , निश्चितच कर्मचारी वर्ग काँग्रेसच्या बाजुने असतील , कारण सेवानिवृत्तीनंतर पेन्शन कर्मचाऱ्यांसाठी खुप महत्वाची बाब आहे . राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे लाभ मिळत नाहीत . यामुळे कर्मचाऱ्यांना जो पेन्शन देईल , त्यांच्या बाजुने असतील असा अंदाज आहे .

नविन वेतन आयोग दर 10 वर्षांनी लागु करण्यात येते , सन 2026 मध्ये नविन वेतन आयोग लागु होणे अपेक्षित आहे , तर त्या आधी 02 वर्षे अगोदर नविन वेतन आयोग समितीची स्थापना होणे आवश्यक आहे म्हणजेच यंदाच्या वर्षी नविन वेतन आयोग समितीची स्थापना होणे आवश्यक आहे .

शिवाय आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने केंद्रात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यास त्यांच्यावर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तसेच नविन वेतन आयोग लागु करण्याचा दबाव निश्चितच असणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *