Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee shasan sudhipatrak gr ] : परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटूंब निवृत्तीवेतन व मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन व सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतुन निवृत्त झालेल्या / होणाऱ्या सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती देणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 30 मे 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार कार्यालय प्रमुख / आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या प्रान खात्यांमध्ये मृत्युसमयी जमा असलेल्या संचित रकमेचे वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अंनियो 2017/ दिनांक 28.07.2017 व वित्त विभागाच्या दिनांक 18.11.2021 रेाजीच्या शुद्धीपत्रकानुसार Error Rectification Module द्वारे रक्कम परत मागविण्यासाठी अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालयाकडे परिपुर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आहेत .

ऐवजी कार्यालय प्रमुख / आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या प्रान खात्यांमध्ये मृत्युसमयी जमा असलेली संचित रक्कम परत मागविण्यासाठी निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण यांचे Exit & Withdrawal Under the National Pension System Regulations 2015 मधील विनियम व तदनंतर वेळोवेळी सुधारणा झालेल्या तरतुदीनुसार आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाकडून विहीत नमुन्यात आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाकडून विहीत नमुन्यात माहिती प्राप्त करुन आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन फॅमिली पेन्शन Exit Withdrawal चा प्रस्ताव अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा काषागाहर कार्यालयाकडे सादर करण्यात यावाअसे निर्देश आहेत .

आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालय यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण प्रणालीवर द्वारे मृत कर्मचाऱ्याच्या प्रान खात्यांमध्ये जमा असलेली एकुण संचित रक्कम परत मागवावी , तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या प्रान खात्यातील संचित रकमेतील कर्मचाऱ्याचे अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम आणि शासनाने अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम याची स्वतंत्र परिगणना केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण यांचेकडून करुन यावी असे नमुद आहेत .

या ऐवजी , आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालय यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण प्रणलीवर ऑनलाईन फॅमिली पेन्शन Exit Withdrawal ला मंजूरी द्यावी तसेच मृत कर्मचाऱ्याच्या प्रान खात्यातील संचित रकमेतील कर्मचाऱ्याचे अशंदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम आणि शासनाने अशंदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम याची स्वतंत्र परिगणना केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण यांच्याकडून करुन घेण्यात यावी अशी सुधारण करण्यात आलेली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *