Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Mansun Entry Update News ] : देशांमध्ये मान्सुनची धमाकेदार एन्ट्री झालेली आहे , तर आता महाराष्ट्रांमध्ये धमाकेदार एन्ट्री होणार आहे . दिनांक 22 मे 2024 रोजी अंदमान येथे मान्सुन दाखल झाला आहे .
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी देशात जुन ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . यंदाच्या वर्षी उन्हाची झळा राज्यातील सर्वच जिल्हांना मोठ्या प्रमाणात लागल्या आहेत , मराठवाडा व विदर्भांमध्ये उन्हांचे तापमान अधिक होते , यामुळे विदर्भ व मराठवाडांमध्ये अवकाळी पावसाचा जोर अधिक होता .
अवकाळी पावसाचा जोर कमी : भारतीय हवामान खात्यांकडून मिळालेल्या अंदाजानुसार दिनांक 31 मे नंतर अवकाळी पावसाचा जोर बऱ्याच अंशी कमी होणार आहे . तर मान्सुनची एन्ट्री राज्यात धडाक्यात होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे .
केरळमध्ये या दिवशी येणार मान्सुन : देशातील केरळ राज्यांमध्ये दिनांक 31 मे रोजी मान्सुन हजेरी लावेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे . म्हणजेच यंदाच्या वर्षी मान्सुन लवकरच पदार्पण करणार आहे . केरळ नंतर मान्सून हळू – हळू पश्चिमेकडून पुर्वीकडे सरकरणार आहे .
राज्यांमध्ये या दिवशी मान्सुन करणार एन्ट्री : राज्यांमध्ये दिनांक 08 जुन नंतर मान्सुनची एन्ट्री होईल , असा अंदाज भारतीय हवामान खात्यांकडून दिला आहे , त्यानंतर मान्सून राज्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात सक्रिय होईल , त्यानंतर राज्यात दिनांक 15 जुन पर्यंत सर्वत्र मान्सुन सक्रिय होईल . असा अंदाज भारतीय हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेला आहे .