कमी जागेमध्ये करा शासकीय योजनेतून शेतीपूरक अधिक फायदेशीर व्यवसाय ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ hi – tech Nursery ] : आजच्या काळामध्ये शेतीपेक्षा शेतीपूरक व्यवसाय मध्ये शेतकरी अधिक नफा कमवत आहेत . यामुळे एखादा शेतीपूरक व्यवसाय उत्तमरीत्या करणे आवश्यक आहे , जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास सहाय्यभूत ठरेल , अशाच प्रकारची शेतीपूरक व्यवसाय म्हणून हायटेक नर्सरी मोठ्या प्रमाणात लोकप्रिय फायदेशीर ठरत आहे .

कमी जागेमध्ये उत्तमरीत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फळ शेती फुल शेती केली जात आहे . त्यातून कमी जागेमध्ये उत्तम दर्जाचे उत्पादन मिळत आहेत . हायटेक नर्सरी मध्ये फळझाडे ,  भाजीपाला तसेच अन्नधान्य पिकांचे रोपे बियाणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले जाते . ज्या पिकांची उत्पादन क्षमता अधिक असते .

यामुळे इतर शेतकरी नर्सरी मधून रोपे खरेदी करण्यास प्रथम पसंती देतात , अशा प्रकारचे नर्सरी उभा करण्यास शासनाकडून अनुदान देखील मिळते . या अनुदानातून हायटेक नर्सरी उभा करू शकता व शेतीपेक्षा दुप्पट उत्पन्न मिळवू शकता  ..

इतके मिळते अनुदान : हायटेक नर्सरी उभा करण्याकरिता शासकीय योजना मधून  दहा लाख रुपये इतके अनुदान मिळते . यामुळे हायटेक नर्सरी उभा करण्याकरिता शासकीय अनुदानातून लाभ घेऊ शकता .

उत्पन्न कसे मिळेल : हायटेक नर्सरी मधून तयार करण्यात आलेले रोपे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना विक्री करू शकता , अथवा शासनासाठी विविध प्रकल्पाकरिता आवश्यक रोपांची टेंडरच्या माध्यमातून विक्री करू शकता . तसेच गावोगावी जाऊन शेतकऱ्यांकडून सदर आरोपांची माहिती देऊन मागणी मिळू शकतात जेणेकरून उत्पन्न वाढीस सहाय्य होईल.

Leave a Comment