Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ LPG gas Cylinder subsidy ] देशात उज्वला योजना अंतर्गत अनेकांना घरगुती गॅस सिलेंडर वर सबसिडी दिली जाते , ज्यांमध्ये आता अधिक पारदर्शकता आणण्यासाठी केवायसी करणे बंधकारक केले आहे . कारण उज्वला योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्यांची संख्या अधिकच वाढली असून , सबसिडी प्राप्तीसाठी काही ग्राहकांना त्रुटी येत असल्याने , केवायसी करणे बंधनकारक केले आहे .
उज्वला योजना अंतर्गत ज्या महिलांना केंद्र सरकारकडून गॅस कनेक्शन मिळाले आहेत , अशांना आता यापुढे गॅस सबसिडी मिळविण्यासाठी केवायसी करणे बंधनकारक असेल . यांमध्ये ज्या ग्राहकांनी दिनांक 01 जुन 2024 पर्यंत केवायसी केली नसेल अशा महिला ग्राहकांना यापुढे सबसिडी प्राप्त होणार नसल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तर या योजना अंतर्गत मिळणाऱ्या इतर सोयी सुविधा देखिल मिळणार नाही . यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सर्व गॅस ग्राहकांना यापुढे आपल्या जवळच्या गॅस अजेन्सीज मध्ये जावून ई – केवायसी करणे बंधनकारक असणार आहेत . केंद्र सरकारकडून दिनांक 31 मे 2024 पर्यंत ई – केवासयी करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले होते .
त्यानंतर ग्राहकांना सदर योजना अंतर्गत लाभ मिळणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . केवायसी ( KYC ) करण्यासाठी ग्राहकांना त्यांच्यासोबत आधार कार्ड , गॅस कनेक्शन कार्ड आवश्यक असणार आहेत .
01 जुन नंतर मिळणार नाही सबसिडी : केंद्र सरकारकडून ई – केवायसी (KYC) करण्याची शेवटची मुदत 31 मे अशी ठरवण्यात आली आहे . त्यानंतर सदर योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या ग्राहकांना सबसिडी दिली जाणार नाही , याकरिता केवायसी ( KYC ) पूर्ण करणे आवश्यक असेल .