Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee pramotion paripatrak] : कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदावर पदोन्नती देणे संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 24 मे 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
सदर परिपत्रकानुसार केंद्रप्रमुख या पदावरील पदोन्नती करिता जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर किमान सहा वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून सेवा जेष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांची पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल , अशी तरतूद शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 27.09.2023 रोजी च्या शासन निर्णयान्वये करण्यात आलेले आहे .
यास्तव केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती करिता सेवा जेष्ठता यादी तयार करताना सहाय्यक शिक्षकाची प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर झालेल्या नियुक्ती दिनांक विचारात घेणे आवश्यक आहे . या अनुषंगाने कार्यवाही होत नसल्याबाबत , श्री राजू पांडे यांचा दिनांक 22 मे 2024 रोजी च्या अर्जाने शासनास कळवले आहे . तरी सदर अर्जदार यांचे अर्जात नमूद केलेल्या बाबी याची खातरजमा करण्यात येऊन …
याबाबत शासन निर्णय दिनांक 27.09.2023 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना संबंधित जिल्हा परिषदांना देण्याचे निर्देश कक्ष अधिकारी शालेय शिक्षण विभाग मार्फत देण्यात आले आहेत .
या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 24 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता.