Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Various Leave & Leave Period Payment Rules ] : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या रजा मिळत असतात , यांमध्ये अर्जित , अर्धवेतन , परिवर्तीत , असाधारण , प्रसुती / गर्भपात अशा प्रकारच्या रजा अनुज्ञेय होत असतात , सदर रजा कालाधीमध्ये , कर्मचाऱ्यांस कोणत्या प्रमाणात वेतन अनुज्ञेय होते , या संदर्भातील सविस्तर रजा नियमावली पुढीलप्रमाणे पाहुयात ..

असाधारण रजा : असाधारण रजा कालावधीमध्ये , राज्य शासकीय कर्मचाऱ्यांस कोणत्याही प्रकारचे वेतन अदा करण्यात येत नाहीत , परंतु त्यांस स्थानिक पुरक भत्ता , घरभाडे भत्ता अनुज्ञेय करण्यात येते . ( सदरची रजा ही अर्जित रजा शिल्लक नसल्याने घेतली जाते . )

अर्जित रजा : अर्जित रजा कालाधीमध्ये राज्य शासकिय कर्मचाऱ्यांस अर्जित रजेवर जाण्याच्या लगतपुर्वी मिळाणाऱ्या वेतनाच्या दरानेच वेतन अदा करण्यात येते . कारण अर्जित रजा ही कर्मचाऱ्यांच्या खाती प्रतिवर्षी साठवणूक करण्यात आलेली असते .

अर्धवेतन रजा : अर्धवेतन वेतन / अनर्जित रजा कालाधीमध्ये कर्मचारी रजेवर जाण्याच्या अगोदर जे वेतन मिळत होते , त्या वेतनाच्या निम्या दराने वेतन आहरित करण्यात येते . ( रजा वेन नियम 70 ( 2) नुसार अर्धवेतन अदा करण्यात येत असते . सदरची रजा अर्जित शिल्लक नसल्यास अदा करण्यात येते . )

परिवर्तित रजा : परिवर्तित रजा कालावधीमध्ये , कर्मचारी रजेवर जाण्याच्या पुर्वी मिळाणाऱ्या वेतनाइतके वेतन रजा कालावधीकरीता मिळते (  रजा नियम 70 ( 3 ) नुसार )  आहरित करण्यात येते .

गर्भपात / प्रसुती रजा : कायम सेवेत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांस सदरची रजा मिळत असते , सदर महिला कर्मचाऱ्यांने प्रसुती / गर्भपात ( कायदेशिर ) रजा कालावधीमध्ये रजेवर जाण्याच्या अगोदर ज्या प्रमाणात वेतन मिळत होते , त्या प्रमाणात वेतन मिळते .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *