Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Mahagai Bhatta Increase News ] : राज्यातील सरकारी , निमसरकारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 50 टक्के प्रमाणे महागाई भत्ताचा लाभ अदा करणेबाबत , राज्य शासनांकडून अधिकृत्त शासन निर्णय पुढील महिन्यात निर्गमित होणार आहे .

राज्यातील कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जानेवारी 2024 पासुन वाढीव 4 टक्के डी.ए चा लाभ अदा करण्यात येणार आहे . ज्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे 50 टक्के दराने वाढीव महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे . सध्य स्थितीमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने डी.ए लाभ मिळत आहे . यांमध्ये आणखीण 4 टक्के डी.ए ची भर पडणार आहे .

डी.ए वाढ बाबत अधिकृत्त शासन निर्णय कधी निर्गमित होणार ? : राज्यातील कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ लागु करणेबाबत , यापुर्वीच सविस्तर प्रस्ताव वित्त विभांगाकडून तयार करण्यात आलेला आहे , परंतु आचारसंहिता मुळे सदर प्रस्तावाला अंतिम स्वरुप मिळाले नाही . सुत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार , दिनांक 4 जुन 2024 नंतर आचारसंहिता हटेल , यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ लागू करणेबाबतचा अधिकृत्त शासन निर्णय हा जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित होण्याची शक्यता आहे .

डी.ए फरक : म्हणजेच राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव डी.ए चा लाभ हो माहे जुन पेड इन जुलै वेतन / पेन्शन देयकासोबत मिळेल . यामुळे कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी , फेब्रुवारी , मार्च , एप्रिल , मे या महिन्याची डी.ए थकबाकी देखिल अदा करण्यात येईल .

घरभाडे भत्ता मध्ये कधी होईल वाढ ? : महागाई भत्ता हा 50 टक्के पेक्षा अधिक झाल्याच्या नंतर सातव्या वेतन आयोगांमध्ये घरभाडे भत्ता मध्ये वाढ करण्याचे नियोजित आहे . तर माहे जुलै 2024 मध्ये परत डी.ए मध्ये वाढ होईल , यामुळे डी.ए चा आकडा हा 50 टक्के पार करेल , यानंतर घरभाडे भत्तामध्ये वाढ होईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *