Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Contractual / Daily Wages & Badali Employee permanent ] : मानधन , रोजंदारी त्याचबरोबर बदली तत्वावर कार्यरत तब्बल 1272 कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा प्रशासनांकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . या निर्णयामुळे सदर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे .
सदरचा निर्णय हा सांगली मिरज कुपवाड पालिका प्रशासनांकडून घेण्यात आलेला आहे , सदर निर्णयानुसार पालिका प्रशासनांमध्ये कार्यरत तब्बल 1272 कर्मचारी यापैकी 313 बदली , 16 रोजंदारी तर 943 कर्मचारी मानधनी तत्वावर कार्यरत होते . पालिका प्रशासनांमध्ये सदर कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याकरीता मंजूर पदे शिल्लक नसल्याने , सदर कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदे निर्माण करुन सदर कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.
तसा सविस्तर अहवाल पालिका प्रशासनांकडून तयार करुन नगरविकास विभागांकडून सादर करण्यात आलेला आहे . याबाबत पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये , प्रस्ताव एकमताने प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला होता , याबाबत पहिला ठराव हा दिनांक 19 ऑक्टोंबर 2022 रोजीच्या सभेत मंजूर करण्यात आलेला होता , त्यानंतर दिनांक 30.12.2023 रोजीच्या बैठकीमध्ये सदर प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला होता .
याबाबत सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघामार्फत वेळोवेळी आंदोलने करण्यात आले होते , अखेर पालिकेतील 1272 कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा मोठा निर्णय पालिकेकडून घेण्यात आलेला आहे .