Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Gopinath Munde apghat Suraksha anudan yojana ] : शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या अपघात ,इजांसाठी राज्य शासनांच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनांच्या माध्यमातुन 2 लाख रुपये पर्यंत सानुग्रह अनुदान दिले जाते .

राज्यातील शेतकऱ्यांना शेती करत असताना , नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या अपघात , इजा यासाठी वरील नमुद योजनांच्या माध्यमातुन सानुग्रह अनुदान दिले जाते , नैसर्गिक घटनांमध्ये वीज पडणे , पुर , विंचूदंश , सर्पदंश , विजेचा शॉक त्याचबरोबर अपघात , वाहन अपघात तसेच इतर कोणत्या कारणांमूळे होणारे अपघातांमध्ये मृत्यु अथवा अपंगत्व येणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानांची तरतुद करण्यात आलेली आहे .

या पुर्वी ही योजना शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना या नावाने कार्यान्वित होती , तर सन 2015-16 मध्ये या योजनेचे नाव गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना असे ठेवण्यात आले . या योजनांच्या माध्यमातुन शेतकऱ्याचा मृत्यु झाल्यास त्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान दिले जाईल . सानुग्रह अनुदानाची रक्कम पुढीलप्रमाणे असणार आहे .

अ.क्रअपघाताची बाबनुकसान भरपाई रक्कम
01.अपघाती मृत्यु2 लाख रुपये
02.दोन डोळे / 2 हात / 2 पाय / एक डोळा व एक हात / एका पाय निकाम झाल्यास..2 लाख रुपये
03.एक डोळा / एक हात / एक पाय निमामी झाल्यास1 लाख रुपये

पात्रता : लाभार्थी हा 10 ते 75 वयोगटातील असणे आवश्यक असेल तसेच त्याच्या नावी शेती असणे आवश्यक असेल .वारसदार म्हणून त्याच्या कुटुंबातील अपघातग्रस्त यांची पत्नी / पती त्यानंतर अपघातग्रस्ताची अविवाहीत मुलगी , अपघातग्रस्ताची आई , अपघातग्रस्ताचा मुलगा , अपघातग्रस्ताचे वडील , अपघातग्रस्ताची सुन , अन्य कायदेशिर वारसदार अशा प्रकारचा वारसदारांचा क्रम लागतो .

या संदर्भात सविस्तर शासन निर्णय / परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी Click Here

आपण जर शेतकरी असाल तर खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *