Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Panjabrao Dakh News ] : राज्यांमध्ये सध्या अवकाळी पावसाची झळा हळू-हळू कमी होत असताना पाहायला मिळत आहेत , तर आता राज्यांमध्ये पुर्वमोसमी पावसाला या दिवशी सुरुवात होणार असल्याचा नवा अंदाज पंजाबराव डख यांनी दिला आहे .

पंजाबरावांचा नवा हवामान अंदाज : दिनांक 22 मे रोजी मान्सुनचे आगमन हे अंदमान मध्ये झालेले आहे , तर राज्यांमध्ये दिनांक 25 मे पर्यंत अवकाळी पाऊस कायम असणार आहे . तर राज्यांमध्ये कोकण , पश्चिम महाराष्ट्र , तसेच मराठवाड्यातील काही भागांमध्ये पुढील 4 दिवस अवकाळी पाऊस तुरळक ठिकाणी पडणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव यांनी दिला आहे .

तर दुसरीकडे दिनांक 01 जुन रोजी केरळमध्ये मान्सुनचे आगमन होणार आहे , तर केरळमध्ये मान्सुनच्या आगमनाच्या नंतर महाराष्ट्रात पुर्व मोसमी पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी सांगितला आहे . केरळमध्ये 1 जुन रोजी मान्सुन आगमनानंतर महाराष्ट्रात दिनांक 01 ते 03 जुन या कालावधीमध्ये पुर्वमोसमी / मान्सुन पुर्व पाऊस पडणार आहे .

तर महाराष्ट्रांमध्ये दिनांक 08 जुन रोजी मान्सुन अधिक सक्रिय होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे , यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये कामांना अधिक वेगाने करण्याचे सुचना देण्यात आलेले आहेत . कारण यंदाच्या वर्षी राज्यांमध्ये जुन , जुलै , सप्टेंबर या कालावधी मध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे .

यंदा पहिले तीन महिने मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे , त्यानंतर पावसाचा ओघ कमी होईल , यामुळे यंदा शेतकऱ्यांना ( विशेष : मराठवाडा / विदर्भ ) मोठा दिलासा मिळणार आहे .

आपण जर शेतकरी असाल तर खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *