Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee good news about pension ] : आता यापुढे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व इतर लाभ हे विहीत वेळेंमध्ये मिळावे , याकरीता राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांमध्ये नविन ( New ) ऑनलाईन संगणक प्रणाली लागु करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन लाभ व इतर निवृत्तीनंतरचे लाभ अदा करण्यासाठी अनेक वेळा विलंब होतो , व त्याचा फटका निवृतत कर्मचाऱ्यांना होत असतो . अशा प्रकारचा विलंब यापुढे टाळण्याकरीता पेन्शन व निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम विहीत काळांमध्ये व प्रक्रियेत अचूकता यावी , याकरीता लेखा कोषागार संचालनालय मुंबई यांच्यामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसीत करण्यात आलेली आहे .
सदरची ऑनलाईन प्रणाली ही राज्यातील विदर्भ , मराठवाडा व त्यानंतर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये लागु करण्यात येणार आहे , या प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर पेन्शन व इतर आर्थिक लाभ विहीत कालावधीमध्ये अदा करण्याचे कामकाज केले जाणार आहेत .
या नविन ऑनलाईन प्रणालीचे नाव हे ई-पीपीओ , ईजीपीओ व ई-सीपीओ असे आहे , सदरची ऑनलाईन प्रणाली ही पहिल्या टप्यांमध्ये मराठवाड्यातील महालेखापाल कार्यालय – नागपुर या कार्यक्षेत्रांमध्ये येणाऱ्या मराठवाडा व विदर्भातील सर्व 19 जिल्ह्यांमध्ये तर दुसऱ्या टप्यांमध्ये मुंबई कार्यकक्षेतील उर्वरित 15 जिल्ह्यांमध्ये सदर प्रणली वित्त विभागाच्या दिनांक 22 मे रोजीच्या निर्णयानुसार लागु करण्यात येणार आहे .
विलंबामुळे कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप : राज्यातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अनेक वेळा कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात , तर अनेक वेळा टपालांने कागदपत्रे पाठविली जात , ज्याचा विहीत कालावधीमध्ये विचार केला जात नाही , यामुळे सदर विकसीत करण्यात आलेल्या प्रणालीमुळे आता यापुढे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे .