Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Transfer New Rules Shasan Nirnay ] : कर्मचाऱ्यांच्या बदली बाबत सुधारित अटी लागू करणेबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 21 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या निर्णयानुसार जिल्हा अंतर्गत बदली करीता जे शिक्षक पुर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्या पैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार संधी देवून जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावेत असे नमुद करण्यात आलेले आहेत , तसेच शाळास्तरावर समान शिक्षक राहतील याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर निर्णयानुसार नव्याने नियुक्ती होणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांस जिल्हा बदलीचा कोणताही हक्क असणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत , तर नव्याने नियुक्तीच्या नंतर इतर जिल्ह्यांमध्ये जावू इच्छित असणाऱ्यांनी रितसर राजीनामा देवून ज्या जिल्ह्यांमध्ये नियुक्ती हवी आहे , अशा जिल्ह्यांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक म्हणून नियूक्ती मिळविणे आवश्यक असेल असे नमुद करण्यात आलेले आहेत .
जर जिल्हा अंतर्गत आपसी बदली ,वैद्यकीय कारणास्तव तसेच तक्रारीच्या अनुषंगाने वा पती -पत्नी एकत्रिकरण अंतर्गत इ. अपवादात्मक प्रकरणी करावयाच्या बदलीर संदर्भात ग्रामविकास विभागाने धोरण ठरविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर निर्णयानुसार प्रथम दिव्यांग प्रवर्गातील शिक्षकांना यादीमधील शाळांमध्ये नियुक्ती देण्याचे निर्देश आहेत, त्यानंतर महिला शिक्षकांना तर त्यानंतर उर्वरित उमेदवारांना प्राथम्य क्रम देवून त्यांच्या मागणीप्रमाणे शाळांमध्ये नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
याबाबतचा सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.