Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Pradhanmantri Kisan Sanman nidhi yojana shasan nirnay ] : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संदर्भात राज्य शासनांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

शेतकऱ्यांकरीता निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आलेली आहे , सदर योजना करीता केंद्र सरकारने निर्गमित करण्यात मार्गदर्शक सुचनांनुसार आयुक्त कृषी यांचे स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनांच्या धर्तीवर एक व सदर योजनांसाठी राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या खर्चासाठी एक अशी दोन स्वतंत्र खाती सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे या बँकेमध्ये उघडली आहेत .

केंद्र पुरस्कृत प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनांच्या प्रशाकीय खर्चासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकरीता जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे जिल्हा स्तरावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक या प्रमाणे 34 जिल्ह्यांसाठी 34 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास मान्यता देण्यात येत आहेत . त्याचबरोबर सदर किसान सन्मान निधी योजना अंतर्गत अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त यांचे स्तरावर आयुक्त कृषी यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया , पुणे येथे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहेत .

तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीकरीता उघडण्यात येणाऱ्या बचत खात्यामधील रक्कमेचा वापर हा त्याच प्रयोजनार्थ करण्यात यावेत , व सदर खात्यामधील मेकर म्हणून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयातील लेखधिकारी हे असतील आणि चेकर म्हणून अधिक्षक कृषी अधिकारी हे असतील असे नमुद करण्यात आलेले आहेत .

यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत  कि , प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना साठी राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त यांच्या नावे उघडण्यात येणाऱ्या बचत खात्यातील रक्कमेचा वापर हा त्याच प्रयोजनार्थ करण्यात यावेत , असे नमुद करण्यात आलेले आहेत .

या संदर्भात कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 17 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *