Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee pay Scale sudharana samiti ] : राज्य वेतन त्रुटी निवारण समिती 2024 प्रस्ताव सादर करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 15 मे 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासनांच्या वित्त विभागाच्या दिनांक 16 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 ची स्थापना करण्यात आली आहे . सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार वेतन त्रुटी निवारण समितीला नियुक्तीच्या दिनांकापासून 6 महिन्यांच्या कालावधीत अहवाल शासनाला सादर करावयाचा आहे ,
याकरीता मंत्रालयीन विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय कार्यालयातील शासनाकडे प्राप्त झालेल्या 7 व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी बाबतचे अहवाल प्रस्तुत शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 3 व 4 येथील नमुद तरतुदीप्रमाणे कार्यवाही करुन प्रस्ताव 2 महिन्यांच्या आत म्हणजेच दिनांक 16 मे 2024 पुर्वी वित्त विभाग / सेवा – 9 कार्यासनाकडे सादर करण्याबाबत नमुद केले आहे .
त्या अपनुषंगाने प्रस्ताव दिनांक 16 मे 2024 पुर्वी वित्त विभाग / सेवा – 9 कार्यासनाकडे सादर करण्याबाबत वित्त विभागाच्या समक्रमांक दिनांक 08 एप्रिल 2024 व दिनांक 09 मे 2024 रोजीच्या पत्रानुसार कळविण्यात आलेले आहेत . तर अद्याप काहीच विभागांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत . तर सध्या लोकसभेच्या निवडणूकांच्या कामाजासाठी मंत्रालयीन विभागातील अधिकारी / कर्मचारी हे कर्तव्य बजावत असल्याने , वेतनत्रेटी निवारण समिती समोर प्रस्ताव सादर करण्यास प्रशासकीय कारणास्तव आणखीण 2 आठवड्यांची दिनांक 31 मे 2024 पर्यंत मूदतवाढ देण्यात येत आहे .
सबब आपल्या विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या शासकीय कार्यालयातील विभागाकडे प्राप्त झालेल्या 7 व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी बाबतचे अहवाल प्रस्तुत शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 3 व 4 येथील नमुद तदतुदीप्रमाणे कार्यवाही करुन दिनांक 31.05.2024 पुर्वी वित्त विभाग / सेवा – 9 कार्यासनाकडे आपल्या अभिप्रायासह सादर करावेत , अशी विनंती करण्यात आलेली आहे .
त्याचबरोबर दिनांक 31 मे 2024 नंतर वेतन त्रुटी निवारण समितीकडे प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचा विचार करण्यात येणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.