Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Namo Shetkari Mahasanman nidhi Yojana ] : राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनांच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरुवात केली असून , या योजना अंतर्गत पीएम किसान सन्मान निधी योजनांचे लाभार्थी हेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचे लाभार्थी आहेत .
आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचे एकुण 3 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले असून , आता 4 था हप्ता बाकी आहे . या योजना अंतर्गत वर्षाला 6,000/-इतकी रक्कम प्राप्त होते . तर पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देखिल 6,000/- रुपये प्राप्त होते म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना एकुण वार्षिक 12,000/- रुपये इतकी रक्कम प्राप्त होते .
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4 था हप्ता : आता पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 3 हप्ते वर्ग करण्यात आलेले असून , 4 था हप्ता बाकी आहे तर पीएम किसान सन्मान निधीचा देखिल 17 वा हप्ता बाकी आहे . यापुर्वी दिनांक 28.02.2024 रोजी पीएम किसान सन्मान निधीचा 16 वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2 रा व तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत .
राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4 था हप्ता हा लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या नंतर लगेच अदा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे , म्हणजेच माहे जुन महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात अथवा जुलै महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात सदर योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा केला जाणार आहे .
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4 था हप्ता सोबत अदा केला जावू शकतात .कारण सतरावा हप्ता देखिल पुढील महिन्यांमध्ये अदा केला जावू शकतो .यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना खरीप खंगामासाठी आर्थिक फायदा होणार आहे .