Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [Ginger Cultivation ] :  आपण नेहमी काही विशिष्ट पिके यांचे उत्पादन घेत असतो , परंतु काहीतरी वेगळे उत्पादन जसे की बाजारामध्ये सर्वाधिक मागणी असणारे , पिकांचे लागवड केल्यास आपणास निश्चितच अधिक फायदा होणार आहे . यापैकी बाजारामध्ये सर्वाधिक मागणी असणारे आले उत्पादन करून लाखो रुपयांचा नफा मिळू शकता .

भारतीय लोकांच्या जेवनामध्ये आल्यांचा समावेश सर्रास केला जातो , त्याचबरोबर चहामध्ये आल्याचा वापर केला जातो . त्याचबरोबर आल्याचा औषधी वनस्पती म्हणून देखील काढा करण्याकरिता वापर केला जातो . तसेच कंपन्यांमध्ये औषध निर्मिती करिता आल्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो , यामुळे आल्याची बाजारामध्ये प्रचंड मागणी आहे .

हवामान : आल्याची लागवड करण्यासाठी वालुकामय चिकन मातीची आवश्यकता असते , ज्यामध्ये आल्याचे उत्पादन सर्वाधिक होत असते . तर मातीचे पीएच (PH ) पातळी ही 06 ते 7.5 दरम्यान असणे अधिक लाभदायक असेल . तर तापमान हे 25° c ते  35 अंश सेल्सिअस दरम्यान असल्यास अधिक लाभदायक ठरेल . आल्याची लागवड साधारणपणे मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये केली जाते , तर त्याचे उत्पादन (काढणी  ) ही माहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान केली जाते .

आल्याची लागवड आठ ते नऊ महिन्यानंतर पूर्णपणे काढणी करता विकसित होते , पूर्ण विकसित झाल्यानंतर आले पिवळी पडून सुखायला लागतात . दर हेक्टरी आल्याचे उत्पादन 150 ते 200 क्विंटल दरम्यान होते . बाजारामध्ये प्रती क्विंटल सर्वसाधारण बाजारभाव 7,000/- इतका आहे . म्हणजेच प्रती हेक्टरी 10 ते 12 लाख रूपयांचा फायदा होईल .

आल्याची लागवड करण्यापूर्वी जमिनीचे परिक्षण करणे अपेक्षित आहे , तसेच तज्ञांचे मत घेवूनच आल्याची लागवड करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *