Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee May month payment Shasan Nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे मे पेड इन जून वेतन देयक अदा करणे संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निधीचे वितरण करणे संदर्भात दिनांक 13 मे 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीत वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाच्या निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना अधीनस्त ठेवण्याची  बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती .सदरच्या शासन निर्णयानुसार सण 2024-25 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेल्या वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे .

यामध्ये सर्वसाधारण शिक्षण ,प्राथमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य ,प्राथमिक शिक्षणासाठी सहाय्य संस्थांना सहाय्य ,प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण या लेखाशीर्षाखाली निधीचे वितरण करण्यात आले आहे .यामध्ये नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधिनस्त 149440 /- इतकी रक्कम वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे .

सदर निधीचे वितरण करताना राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे .तसेच खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग एक उपविभाग एक मधील अनुक्रमांक 27 नियम 149 प्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे .

तसेच जिल्हा परिषदांसाठीचे वेतनेत्तर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये असे निर्देश देण्यात आले आहेत . त्याचबरोबर विविध शासकीय ,प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदान आहे ,मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करून घ्यावेत असे निर्देश देण्यात आले आहे .

या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 13 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे .

शासन निर्णय (GR)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *