Live marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra Rain Update new Latest Andaj ] : भारतीय हवामान खात्याकडून राज्यातील अवकाळी पावसाचा अंदाज पुढील 72 तासांसाठी सांगण्यात करण्यात आला आहे . यामध्ये राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये तुफान गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे . तर राज्यातील 33 जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
या 09 महिन्यांमध्ये होणार वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट : भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या अंदाजानुसार राज्यातील अकोला , अमरावती , नागपूर , वाशिम ,बुलढाणा, लातूर, नांदेड , सातारा ,पुणे या नऊ जिल्ह्यांमध्ये तुफान वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता होणार आहे . सदर जिल्ह्यामध्ये काल दिनांक 12 मे 2024 रोजी तुफान गारपीट झाली असून पुढील 72 तासापर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे .
तर राज्यातील संपूर्ण मराठवाडा , विदर्भ ,कोकण ,मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर ,अहमदनगर ,सांगली ,नाशिक तसेच संपूर्ण खान्देश तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे अशा 33 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अलर्ट पुढील 72 तासापर्यंत वर्तवण्यात आलेला आहे .यामुळे सर्वांनी सतर्कतेची काळजी घेणे आवश्यक असणार आहे .
पुढील 72 तासामध्ये मराठवाडा ,विदर्भ ,उत्तर महाराष्ट्र या भागातील जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार , अरबी समुद्रात चक्राकार पद्धतीने वाऱ्याची स्थिती तयार झाल्याने , राज्यात वादळी वारे सुसाट वाहत आहेत . यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात शेतमालाची नुकसान होत आहेत .
सदर वारे चक्राकार पद्धतीने वाहत असल्याने , मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे . यामुळे वरील केलेल्या नऊ जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी असे निर्देश भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेले आहे .