Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee May month payment update ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे मे 2024 चे वेतन अदा करणे संदर्भात महत्वपूर्ण अपडेट शिक्षण संचालक मार्फत देण्यात आली आहे . या संदर्भात माननीय शिक्षण संचालक यांच्याकडून दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी सविस्तर परिपत्रक काढण्यात आले आहेत .

सदर पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की ,  राष्ट्रीय पेन्शन योजना धारक कर्मचारी मे महिन्यामध्ये सेवानिवृत्त असल्यास , त्यांची  NPS वर्गणी व शासन हिस्सा कपात करण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आले आहे . तर ज्यांचे नवीन प्रान नंबर प्राप्त झाली आहे , त्यांचे मे महिन्याच्या वेदनातून नियमित स्वरूपात एनपीएस रक्कम कपात करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे .

सध्या राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एसबीआय सीएमपी ,  कुबेर ही प्रणाली वापरली जात असल्याने , ज्यांचे खाते नंबर आयएफसी कोड चुकीचे आहे , अशांचे बँक खाते नंबर , आयएफसी कोड दुरुस्त करून घ्यावेत . ज्यामुळे  कुबेर वेतन प्रणाली द्वारे थेट बँक खात्यामध्ये पगार वर्ग केले जाईल . तर चुकीचा अकाउंट नंबर आयएफसी कोड नमूद झाल्यास अशा कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा तांत्रिक अडचणीमुळे विलंब होऊ शकतो .

त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांना आयकर कपात करायची असेल त्यांचे आयकर रक्कम वेतन मधून कपात करण्यात यावे . त्याचबरोबर BROKEN PERIOD मधून वेतन अदा करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांशी प्रथम पूर्व परवानगी घेण्याचे निर्देश देण्यात आलेली आहे .

माहे मे 2024 चे देयक सादर करण्याचे वेळापत्रक शिक्षण संचालका मार्फत देण्यात आले आहे , यामध्ये DDO – 1 कडे देयके फॉरवर्ड करण्यासाठी 14 मे 2024 पर्यंत अवधी देण्यात आला आहे  ,तर मुख्याध्यापक /  गटशिक्षणाधिकारी यांनी हार्ड कॉपी प्रति स्वाक्षरीकरिता पंचायत समिती /  लेखाधिकारी यांना 15 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहे , या संदर्भातील सविस्तर वेळापत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *