Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state weather news update] : राज्यातील बहुतांश भागांमध्ये मागील पाच दिवसापासून पाऊस पडत आहे , यामुळे राज्याचे तापमान बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. सद्यस्थितीमध्ये दिनांक 16 मे पर्यंत राज्याचा सर्वसाधारण तापमान हा 35°c असते 25°c दरम्यान असणार आहे. तर दिनांक 16 मे पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे .
दिनांक 16 मे पर्यंत कोल्हापूर , सांगली ,धाराशिव ,लातूर ,सोलापूर या जिल्ह्यामध्ये गारपीटीची मोठी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राज्यातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .दरम्यानच्या कालावधीमध्ये राज्याची तापमान 35°c ते 25°c दरम्यान असणार आहे , तापमान कमी झाले असल्याने उष्णतेची लाट हळूहळू व ओसरताना दिसून येत आहे .
मुंबई ,पुणे ,नागपूर अशा मोठ्या शहरात उष्णतेची मोठी लाट उसळली होती , मागील पाच दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने , तापमान बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. आज दिनांक 12 मे रोजी मुंबई शहराचे तापमान 33° ते 27 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान असणार आहे , तर पुणे शहराचे तापमान 30°c ते 24°c दरम्यान असणार आहे . त्याचबरोबर नागपूर शहराचे तापमान 28°c ते 22°c दरम्यान असणार आहे .
काल दिनांक 11 मे 2024 रोजी पश्चिम महाराष्ट्र मध्ये नाशिक, अहमदनगर ,जळगाव, धुळे ,नंदुरबार, पुणे ,सातारा ,सांगली या जिल्हयात गारपिटाचा पाऊस झाला आहे. तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये दिनांक 16 मे पर्यंत ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .
तर धाराशिव, सोलापूर, लातूर ,कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यामध्ये जोरदार गारपीटीचा अवकाळी पाऊस दिनांक 16 मे पर्यंत कायम असणार आहे . अशा प्रकारची माहिती भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे . तर कोकण विभागामध्ये ढगाळ वातावरणासह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .