Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee old pension scheme update news] : राज्यातील NPS धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट मार्फत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . याबाबतचा सविस्तर पत्रक पुढीप्रमाणे पाहुयात ..
सदरचा पत्र हा मा. राज्याध्यक्ष / मा सचिव महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांना सादर करण्यात आलेले आहेत , या पत्रामध्ये नमुद करण्यात आले आहेत की, राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात कर्मचाऱ्यांचे विविध आंदोलने, मोर्चे निघाले , देशांमध्ये काही राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली आहे , त्याप्रमाणे राज्यातील NPS धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावित .
त्याचप्रमाणे राज्यातील कर्मचऱ्यांना योग्य न्याय मिळावा , याकरीता राष्ट्रवादी काँग्रेसची – शरद पवार गट यांची आग्रही भूमिका आहे . आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कर्मचाऱ्यांच्या हिताचे योग्य निर्णय घेतील , तसेच जुनी पेन्शन योजना,DA बाबत काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यास सकारात्मक निर्णय घेतील .
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट मार्फत निर्गमित करण्यात आलेला सविस्तर प्रसिद्धीपत्रक पुढीप्रमाणे पाहुयात ..
निवडणुकीच्या तोंडावर असताना कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा महत्त्वपूर्ण ठरत आहे . यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट यांच्यामार्फत प्रसिद्धीपत्रक राज्य शासनाच्या पेन्शन समितीस सादर करून कर्मचाऱ्यांचे हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न करीत आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.