लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर आपल्या वेतनाच्या फिटमेंट फॅक्टर व महागाई भत्तांमध्ये मोठी वाढ होणार आहे . डी.ए ( महागाई भत्ता ) वाढ व फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ होणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये चक्क दुप्पटीने वाढ होणार आहे . या संदर्भात केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत हिरवा कंदील दिला आहे .
महागाई भत्तामध्ये वाढ : केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 01 जुलै 2023 पासून आणखीण चार टक्के वाढ लागु करणार आहे , सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून 42 टक्के दराने वाढ लागु करण्यात आलेली आहे . केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना चार टक्के वाढ जुन वेतनासोबत अदा करणे प्रस्तावित असतानाच केंद्र सरकार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तांमध्ये आणखीण चार टक्के वाढ लागु करण्यात येणार आहे .
महागाई भत्तामध्ये जुलै 2023 पासून 4 टक्के वाढ लागु केल्यास , केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यांपासून 46 टक्के दराने महागाई भत्ता लागु होईल ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये तसेच पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे .देशांमध्ये केंद्र सरकारच्या निर्णयापुर्वीच गुजरात राज्य सरकारने जुलै 2023 मधील डी.ए वाढीबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे .
फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ : फिटमेंट फॅक्टरप्रमाणे कर्मचाऱ्यांना मुळ वेतन अदा करण्यात येत असते , यामधील वाढ म्हणजे कर्मचाऱ्यांच्या किमान मुळ वेतनातील वाढ असते . सध्या कर्मचाऱ्यांना 2.57 टक्के फिटमेंट फॅक्टर प्रमाणे किमान मुळ वेतन यांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान मुळ वेतन 18,000/- रुपये तर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना 15,000/- किमान मुळ वेतन मिळते . आता फिटमेंट फॅक्टरमध्ये 3.68 टक्क्यांपर्यंत वाढ करणे निर्धारीत आहे , यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन हे 26,000/- रुपये तर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन हे 21,100/- रुपये होईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , पेन्शनधारक कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !