Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Central Employee Mahagai Increase after Gratuity Increase News ] : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणूकीच्या काळांमध्ये डी.ए वाढीनंतर आता ग्रॅच्युईटीमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे . यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .

केंद्र सरकारी कर्मचारी / पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2024 पासुन 4 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आली असल्याने , केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकुण 50 टक्के दराने महागाई भत्ता ( DA ) मिळत आहे . आता कर्मचाऱ्यांमधील रोष करण्यासाठी केंद्र सरकारमार्फत सेवानिवृत्ती उपदानाच्या रक्कमेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .

सदर सेवानिवृत्ती उपदानाची मर्यादा ही डी.ए 50 टक्के पार केल्याने वाढली आहे . कारण महागाई भत्ताच्या आधारावर सरकारी कर्मचाऱ्यांना देय इतर भत्यांमध्ये वाढ होत असते . जसे कि , डी. ए वाढले कि , घरभाडे भत्ता , वाहन भत्ता , पुरक भत्ता अशा भत्यांमध्ये वाढ होताना दिसून येते .आता डी.ए चा आकडा 50 टक्के पर्यंत पोहचल्याने , सदर ग्रॅच्युईटीची रक्कमेमध्ये वाढ झालेली आहे .

सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या रक्कमेस सेवानिवृत्ती उपदान ( ग्रॅच्युईटी ) असे म्हणतात . डी.ए वाढी बरोबर ग्रॅच्युईटी रक्कमेमध्ये देखिल प्रचंड वाढ झालेली आहे . जी कि महागाई भत्तावर आधारीत वाढ करण्यात आलेली आहे .

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डी.ए हा 50 टक्के वाढ झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या नंतर / मृत्यू नंतर उपदानाची मर्यादा ही 25 टक्के वाढविण्यात आलेली आहे . सदरचा लाभ हा माहे जानेवारी 2024 पासून देय होणार आहे , यापुर्वी ग्रॅच्युईटी व मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा ही 20 लाख रुपये अशी होती , आता यांमध्ये 5 लाखांची वाढ केल्याने , आता कमाल मर्यादा ही 25 लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे .यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांन दिलासा प्राप्त झाला आहे .  

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *