Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Pension Rules Sudharana Adhisuchana ] : महाराष्ट्र राज्य निवृत्तीवेतन नियम 1982 मध्ये सुधारणा करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 08.02.2024 रोजी महत्वपुर्ण अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे . सदर सुधारणा नियमास महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 2024 असे संबोधण्यात येईल .
यांमध्ये म.रा.निवृत्तीवेतन नियम 1982 च्या नियम 116 मधील पोट नियम 5 मध्ये अ खंड 3 ऐवजी आता पुढील खंड दाखल करण्यात येत आहेत . यांमध्ये अविवाहित मुलींच्या बाबतीत ती 24 वर्षे वयाची होईपर्यंत अथवा तिचा विवाह होईपर्यंत जे अगोदर घडेल तोपर्यंत अथवा विधवा अथवा घटस्फोटित असणाऱ्या व ती स्वत :ची उपजिविका करत नाही अशा मुलींच्या बाबतीत खंड मध्ये दाखल करण्यात येत आहेत .
तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या अथवा निवृत्तीवेतनाधरकाच्या आणि त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या मृत्युपुर्वीच अस्तित्वात असलेली विकलांगता , तसेच जेव्हा मयत शासकीय कर्मचारी अथवा निवृत्तीवेतनधारक त्याच्या पश्चात खंड 1 अथवा खंड 2 किंवा खंड 3 नुसार कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असलेली विधवा किंवा विधूर अथवा मुलगा किंवा मुलगी नसेल त्याबाबतीत अथवा जर खंड 1 / खंड 2 किंवा खंड 3 नुसार कुटुंब निवृत्तीवेतनासाठी पात्र असलेली विधवा अथवा विधूर किंवा मुलगा किंवा मुलगी मृत पावली असेल ..
किंवा त्या खंडामध्ये विहीत केलेल्या कुटुंब निवृत्तीवेतनास पात्र राहणार नसेल तर अविवाहित / विधवा / घटस्फोटित मुलीला 24 वर्षे वय पुर्ण झाल्याच्या नंतर आयुष्यभरासाठी किंवा तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत अथवा तिचे उपजिविकेस सुरुवात करीपर्यंत जे अगोदर घडेल तोपर्यंत सदर संबंधितांस निवृत्तीवेतन मंजुर करण्यात येईल , याकरीता पुढील अटी व शर्तींचे अधिन राहणे आवश्यक असेल .
यांमध्ये शेवटचे अपत्य हे विहीत वयाचे होईपर्यंत अपत्यांना प्रथम कुटुंब निवृत्तीवेतन प्रदेय असेल , तसेच कुटुंब निवृत्तीवेतन मिळविण्यासाठी विकलांगता असणारे अपत्य पात्र ठरतील , तसेच अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलगी जेव्हा तो किंवा ती किंवा ते हयात होते तेव्हा तिच्या पालकावर किंवा पालकांवर अवलंबून होती .तसेच ज्यावेळी मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्तीवेतनधारकांच्या मागे चोविस वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या एकपेक्षा जास्त अविवाहित किंवा विधवा अथवा घटस्फोटित मुली असतील तेंव्हा जी मुलगी त्याच्या जन्मक्रमानुसार या पोट नियमाप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन मंजूर करण्याची पात्रतेच्या अटी पुर्ण करील अशा मुलीला प्रथम कुटुंब निवृत्तीवेतन प्रदेय होईल .
तसेच सर्वात मोठी मुलगी तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा ती उपजिविकेस सुरुवात करीपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत सदर मुलगी कुटुंब निवृत्तीवेतनास हक्कदार असेल तर सर्वात धाकटी मुलगी तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या मुलीचा विवाह झाल्यानंतर अथवा पुनर्विवाह झाल्याच्या नंतर किंवा तिच्या उपजिविकेस सुरुवात केल्याच्या नंतर किंवा मृत झाल्यानंतर कुटुंब निवृत्तीवेतनास पात्र ठरेल .
तर विधवा मुलींच्या बाबतीत तिच्या पतीचा मृत्यु अथवा घटस्फोटित मुलींच्या बाबतीत , शसकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत घटस्फोट झाल्यास , देय राहील .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.