Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ In Leave Period TA allowance ] : सुट्टीच्या कालावधीमध्ये कर्तव्यावर असणाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक 05 एप्रिल 2010 रोजीच्या निर्णयानुसार वाहन भत्ता अदा करणेबाबत शिक्षण विभाग ( प्राथमिक ) जिल्हा परिषद – परभणी कार्यालयामार्फत दिनांक 07 मे 2024 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , वित्त विभागाच्या दिनांक 05 एप्रिल 2010 रोजीच्या शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना वाहतुक भत्ता लागु करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन नियम 2019 ) नुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जानेवारी 2016 पासुन सुधारित वेतन स्तर लागु करण्यात आलेला आहे . त्यानुसार राज्य सरकारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजुर करण्यात आलेला वाहतुक भत्याच्या दरात वित्त विभागाच्या दिनांक 20 एप्रिल 2022 रोजीच्या निर्णयानुसार सुधारणा करण्यात आलेली आहे .

तसेच मुख्याध्यापक महासंघ जिल्हा शाखा परभणी यांच्या दिनांक 15 एप्रिल 2024 नुसार उन्हाळी सुट्टीचे कालावधी करीता वाहतुक भत्ता मिळण्याची विनंती करण्यात आलेली आहे .

यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये काम करणाऱ्या अपग्रेड मुख्याध्यापकांना उन्हाळी सुट्टीचे कालावधीत माहे मे 2010 पासुन कपात केला जात असलेला वाहतुक भत्ता फरकासह लागु करण्यात येत आहे . तरी ज्या मुख्याध्यापकांचा उन्हाळी सुट्टी मध्ये वाहतुक भत्ता कपात करण्यात आलेले आहे , त्यांना तात्काळ वाहतुक भत्याची रक्कम फरकासह अदा करण्यात यावी तसेच माहे मे 2024 च्या वेतन देयकांत मुख्याध्यापकांना वाहतुक भत्ता समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

याबाबतचा दिनांक 07.05.2024 रोजीचा सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *