Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Lic Jivan Umang Policy ] : भारतीय आयुर्विमा कंपनी मार्फत अनेक प्रकारच्या विमा पॉलिसी विक्री केली जाते , यांमध्ये सर्वाधिक लाभदायक व लोकप्रिय असणारी विमा पॉलिसी म्हणजे जीवन उमंग पॉलिसी होय , या पॉलिसी अंतर्गत आयुष्यभर लाभ मिळत राहते .
पॉलिसीचे स्वरुप : या पॉलिसीचे नाव जीवन उमंग ( Jeevan Umang )असे आहे , या विमा पॉलिसीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे कमी प्रिमियम मध्ये मोठा आर्थिक लाभ मिळतो , तर मुदतीनंतर प्रति वर्षी आयुष्यभर 48,000/- रुपये इतका निरंतर लाभ मिळत राहतो , यामुळे ही पॉलिसी सर्वाधिक लाभदायक ठरत आहे .
लाभ कसा मिळेल : या पॉलिसीमध्ये जर विमाधारकांने वयाच्या 25 व्या वर्षी 30 वर्षे कालावधीच्या मुदतीकरीता गुंतवणूक करण्याचे ठरविले तर त्यास प्रतिदिन 54/- रुपये इतका तर प्रतिमहा 1638/- रुपये इतका प्रिमियम भरावा लागेल . सदर विमाधारकाच्या 55 व्या वर्षी सदर पॉलिसीची मॅच्युरिटी संपेल , त्यानंतर त्यास 28 लाख रुपये इतका बोनस प्राप्त होईल तसेच ..
मुदत संपल्यामुळे 48,000/- रुपये रक्कम नियमित दरवर्षी मिळत जाईल , ही रक्कम वयाच्या 100 व्या वर्षांपर्यंत लाभ मिळत राहील . यामुळे ही पॉलिसी गुंतवणूकीसाठी अधिक फायदेशिर ठरणा आहे .
विमाधारकाच्या मृत्युनंतरचे लाभ : विमाधारकाचा मृत्यु झाल्यास त्याच्या वारसाला प्रत्यावर्ती स्वरुपाचा बोनसचा लाभ दिला जाईल , ज्यांमध्ये विमाधारकांने भरलेले प्रिमियम रक्कमेच्या 105 टक्के पेक्षा पेक्षा अधिक असणार नाही .