लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्यातील सरकारी – निमसरकारी ( जिल्हा परिषदा ) , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , नगरपालिका – नगरपरिषद कर्मचारी यांना जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा देणारी पेन्शन योजना लागु करण्याचे राज्य शासनांने मान्य करुन राज्य कर्मचाऱ्यांना लेखी आश्वासने दिलेले आहेत . राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभ अनुज्ञेय करण्यासाठी राज्य शासनांकडून गठित अभ्यास समितीचे तीन महिन्यांचा कालावधी हा दि.14 जून 2023 रोजी संपणार आहे .
अभ्यास समितीस राज्य कर्मचारी समन्वय समिती , महाराष्ट राज्याच्या वतीने पेन्शन प्रस्ताव तयार करुन सादर करण्यात आलेला आहे . यामध्ये स्पष्ट नमुद करण्यात आलेले आहे कि , जुनी पेन्शन प्रमाणे मिळणारे सर्व लाभ अनुज्ञेय करण्यात यावेत यांमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही .जरी राज्य शासनांकडून नविन पेन्शन योजना लागु केले तरी त्यांमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे सेवानिवृत्तीनंतर शेवटचे मूळ वेतनाच्या 50 टक्के निवृत्तीवेतन मिळणार असेल त्याचबरोबर निवृत्तीवेतनाचे 40 टक्के अंशराशीकरण आवश्यक ठरेल .
तसेच भविष्य निर्वाह निधी योजना ( GPF ) ची 12 टक्के प्रमाणे कपात करणे आवश्यक राहील , हे सुत्र नविन पेन्शन योजनेमध्ये अभ्यास समितीकडून विचार करणे आवश्यक आहे , अन्यथा कर्मचारी पुन्हा संपावर जातील अशी भूमिका घेण्यात आलेली आहे .राज्यातील कर्मचारी – शिक्षकांना ज्या उद्उेशाने जुन्या पेन्शपन योजनेद्वारे ( OPS ) आर्थिक व सामाजिक हक्काची सुरक्षा बहाल करण्यात आली होती , ती रद्द करुन नविन अंशदान पेन्शन योजना ( NPS ) दि.01 नोव्हेंबर 2005 पासून महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आली .
हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांना DA वाढीसह किमान मूळ वेतनात मिळणार मोठी वाढ !
गेल्या 17 वर्षांच्या अनुभवानंतर सदर जुन्या पेन्शन ऐवजी लागु करण्यात आलेली नविन अंशदान पेन्शन योजना कर्मचारी – शिक्षकांच्या सेवानिवृत्तीनंतर , आर्थिक कुचंबणा करणारी ठरत आहे . यामुळे आता राज्य शासनांकडून कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर 50 टक्के अधिक अनुज्ञेय महागाई भत्ता असे हमीनुसार पेन्शन लाभ लागु करणेबाबत उचित कार्यवाही करणे उचित ठरेल .
अभ्यास समितीस राज्य समन्वय समितीने सादर करण्यात आलेला सविस्तर पेन्शन प्रस्ताव डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !