Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Punjabrav Dakh Havaman Andaj ] : आजपासून राज्यात पुढील चार दिवस वादळी वारे , विजेच्या गडगडाटसह अवकाळी पाऊस धुमाकुळ घालणार असल्याचा हवामान अंदाज पंजाबराव डख ( हवामानशास्त्र ) यांनी वर्तविण्यात आला आहे .
सदरच्या पाच दिवसांमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणत अवकाळी पाऊस पडण्याची मोठी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे , भारतीय हवामान खाते व पंजाबराव डख यांनी सांगितलेला अंदाज सारखाच असल्याने , अवकाळी पावसाची दाट शक्यता असणार आहे .
आज दिनांक 07 मे ते दिनांक 11 मे 2024 पर्यंत राज्यातील विदर्भ , मध्य महाराष्ट्र व मराठवाडा या भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यांसह , विजेच्या गर्जना सहीत गारपीटाचा अवकाळी पाऊस होणार आहे . तर पंजाबराव डख यांनी सांगितल्यानुसार अवकाळी पावसातील हा पाऊस सर्वात जोरदार असल्याचे सांगितले आहेत . यामुळे या कालावधीमध्ये , शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आलेला आहे .
हा पाऊस इतका प्रचंड मोठा असणार आहे कि , या पावसानंतर शेतीचे बांध भरुन येतील तसेच नदी , तलावाला पाणी येईल , इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे भाकित करण्यात आलेले आहेत .
बंगालच्या उपसागरांमध्ये निर्माण झालेल्या वादळाचा परिणाम म्हणून सदर अवकाळी पावसादरम्यान जोराचा वारा धुमाकुळ घालणार असल्याचे संकेत देण्यात आलेले आहेत . यामुळे शेतकऱ्यांनी दिनांक 07 मे ते दिनांक 11 मे या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये शेतमाल , जनावरे यांची योग्य प्रकारची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .