Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Portal Launch From Central Governmetn for Pensioners ] : पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारकडून नविन पोर्टल लाँच करण्यात आलेला आहे . या पोर्टनुसार पेन्शन धारकांना अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत .

पेन्शन धारकांना ऑनलाईन पद्धतीने काही सुविधांचा लाभ घेता यावेत , याकरीता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातुन इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टल नावाचे नविन ऑनलाईन पोर्टची सुरुवात करण्यात आलेली आहे . या पोर्टलच्या माध्यमातुन पेन्शनधारकांना नेमक्या कोणत्या प्रकारच्या सुविधा मिळणार ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पोर्टल बद्दल थोडक्यात : या पोर्टलच्या माध्यमातुन पेन्शन धारण करणाऱ्या व्यक्तीस वैयक्तिक तसेच पेन्शन सेवा संबंधित तपशिल बाबतच्या सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहेत . तसेच पेन्शन मंजूरीची माहिती आता SMS तसेच मेलद्वारे दिली जाईल .

आता या पोर्टलच्या माध्यमातुन पेन्शन धारकांना कागदपत्रे जसे कि हयात असल्याचा दाखला सादर करता येणार आहेत , तसेच पेन्शनची माहिती ( पेन्शन स्लिप ) उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत , तसेच वयांनुसार वाढीव पेन्शनचा प्रस्ताव देखिल सदर पोर्टलच्या माध्यमातुन पारीत करण्यात येईल .

या पोर्टलची सुविधा ही SBI , बँक ऑफ बडोदा , पंजाब नॅशनल बॅक या बँकेत पेन्शन घेणारे पेन्शनधारक घेवू शकतील , यांमध्ये प्रामुख्याने जीवन प्रमाणपत्र , फॉर्म नं-16 , भरायचा आणि प्राप्त झालेल्या रक्कमेचा तपशिल त्याचबरेाबर पेन्शन स्लिप पाहण्याची सुविधा यांमध्ये उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *