Spread the love

Live Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ NPS Employee IMP GR ] : राष्ट्रीय निवृत्तीवेतन धारक योजनेच्या अंमलबजावणीबाबत , राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सभसदत्व संपुष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभांबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 03 मे 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या शासन शुद्धीपत्रकानुसार वित्त विभागाच्या दिनांक 28.07.2017 रोजीच्या परिपत्रकातील , परिच्छेद क्र.02 मध्ये सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना पुढीलप्रमाणे सुचना निर्गमित करण्यात आलेले आहेत .  सदर परिपत्रकानुसार सर्व आहरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंतर्गत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या सभासदांची सेवानिवृतती दिनांकापुर्वी लगतच्या 3 महिन्यात अंशदाते कपात करु नयेत व कोषागार अधिकारी यांनीही देयक पारित करीत असतांना याची दक्षता घ्यावी असे सूचित करण्यात आलेले आहेत .

तसेच सदर परिच्छेदांमध्ये पुढीलप्रमाणे सर्व आहारण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियत वयोमान सेवानिवृत्ती दिनांकापुर्वी लगतच्या 1 महिन्यात मासिक अंशदान कपात करु नयेत व कोषागार अधिकारी यांनीही देयक पारित करीत असतांना याची दक्षता घ्यावी अशी सुधारण करण्यात येत आहेत .

या संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 03 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *