Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Agri Soil Health Update ] : शेतीमध्ये उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी , जमिनीच्या सुपिकतेकडे लक्ष देणे आवश्यक असते . तसेच दिवसेंदिवस जमीनीची होणारी धुप थांबविली पाहीजे , याकरीता शेतकऱ्यांनी कोणकोणते उपाय योजना राबविले पाहीजे या बाबत सविस्तर माहिती या लेखांमध्ये घेवूयात ..

जमीनीमध्ये ओल हे कायम थोपवून ठेवण्याकरीता , पावसाच्या पाण्यामुळे बहुधा जमिनीची धुप होते , तर यामुळे जमिनीचा आच्छादन भाग निघून जातो .पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरण्याकरीता विविध उपाययोजना केल्या पाहिजेत , जसे कि  शेतीजमीनीच्या चारी बाजुंनी बांध घालावा जेणेकरुन जमीनीतील पाण्याची पातळी वाढले , व जमिनीची धुप देखिल थांबेल .

तसेच जमिनीमधील पाण्याचे पातळी वाढवावी , व बाष्पीभवन कमी होईल , अशा प्रकारचे उपाय योजना राबविण्यात यावेत , जसे कि शेतीच्या चारी बाजुंनी झाले लावावित , ज्यामुळे मातीची धुप व बाष्पीभवन यांपासून संरक्षण मिळेल . तसेच वर्षानुवर्षे विशिष्ट पिकांचीच लागवड केल्यास मातीमधील सर्व घटकांचा वापर होत नाही , यामुळे वर्षानुवर्षे पिकांची अदलाबदल करावी .

सेंद्रिय खतांचा वापर करावा : सेंद्रिय खतांचा वापर केल्यास , निश्चितच जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते , यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी करुन गांडूळ खत , कंपोस्ट खत अशा खतांचा वापर करावा , जेणेकरुन जमीनीमधील सुपिकता कायम राहण्यास मदत होते .

माती परिक्षण : माती परिक्षण करुन घ्यावेत , जेणेकरुन मातींमध्ये कोणते घटक आहेत , कोणते घटक कमी आहेत , याची माहिती होईल , ज्यातुन आपणांस आवश्यक घटकांचा जमीनीत टाकून जमिनीची सुपिकता वाढवू शकतो , ज्यामुळे जमिनीची सुपिकता वाढण्यास सहकार्य होईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *