Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Panjabrav Dakha Havaman Andaj ] : हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी नवा हवामान अंदाज वर्तविला आहे , यांमध्ये या महिन्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे , तर काही ठिकाणी गारपीठ होणार असल्याचे संकेत वर्तविण्यात आले आहेत .
मागील आठवड्यांपासून राज्याचा तापमानाचा पारा हा 1 अंश सेल्सिअर वाढला आहे , यांमध्ये हवामानांमध्ये दमटपणा अधिक आला आहे . तर राज्यातील काही भागांमध्ये तापमान हा 42 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदविण्यात आलेला आहे . उन्हाच्या वाढत्या हवामानांमुळे सर्वांना हैराण करुन ठेवले आहे . तर या महिन्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे , तर काही ठिकणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
हवामानतज्ञ पंजाबराव यांनी दिलेल्या अंदाजानुसार , मे महिन्यांमध्ये राज्यात दिनांक 7 मे ते 11 मे कालावधीमध्ये ( पाच दिवसांच्या काळात ) राज्यांमध्ये जोराचा मुसळधार पाऊस पडणार असल्याचे संकेत वर्तविण्यात आलेले आहेत . यांमध्ये विदर्भात सदर पाच दिवसांच्या कालावधीत जोराचे वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेले आहेत .
तर मराठवाडा मध्ये देखिल दिनांक 7 मे पासुन पुढील 5 दिवसांच्या कालावधीमध्ये अवकाळी पावसाची मोठी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . तर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर सदर कालावधीमध्ये गारपीटांसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
तर कोकण भागाचा विचार केला तर , दिनांक 7 मे 11 मे या 5 दिवसांच्या काळात मुसळधार पावसांसह मोठा पाऊस पडणार आहे , तर उत्तर महाराष्ट्र भागाचा विचार केला असता , मुसळधार पावसांमुळे शतीपिकांचे ( बागयत पिकांचे ) मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे संकेत वर्तविण्यात आलेले आहेत .