Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [Maharashtra State New havaman Andaj Update ] : राज्यांमध्ये सध्याच्या घडीला अवकाळी पावसाची तिव्रता कमी होत , चालली असली , उष्णतेच्या लाटेमध्ये कमतरता दिसून येत नाही . दिवसेंदिवस उन्हाचा पार चढताना दिसत आहे .यामुळे शेती पिकांचे नुकसान तर होतच आहेत , त्याचबरोबर मुके जनावरे व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत .

सध्या राज्याचा तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअस दरम्यान आहे , तर वाढत्या उष्णतेमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे . पाऊस पडला तर वातावरण काही प्रमाणात थंड होत आहे , तर दुसऱ्या दिवशी आणखीण तिव्र उष्णतेमुळे वातावरण आणखीण पेटत आहे .पुढील दोन दिवसाचा हवामान अंदाज भारतीय हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेला आहे , यांमध्ये कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडेल तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार नाही , याबाबतची सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

हवामान खात्याकडून मिळालेल्या अंदाजानुसार आज राज्यातील हवामान हे कोरडे असतील . तर आज पासुन ते दिनांक 01 मे 2024 पर्यंत राज्यातील पुर्व विदर्भ , मध्य महाराष्ट्र मध्ये जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे , सदर कालावधीमध्ये राज्यापेक्षा कर्नाटक व उत्तर केरळ भागांमध्ये अवकाळी पावसाची तिव्रता अधिक असणार आहे .

तर सध्या राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने , राज्यांमधील विविध भागांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे .तर हवामान खात्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार , विदर्भातील 9 जिल्हे यांमध्ये गडचिरोली , यवतमाळ , वाशिम , चंद्रपुर , नागपुर , गोंदिया , अमरावती , भंडारा , वर्धा या नऊ जिल्ह्यांना दिनांक 01 मे 2024 पर्यंत अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .

तर सदर कालावधीमध्ये मुंबई , ठाणे , पालघर , सिंधुदुर्ग , रत्नागिरी , रायगड या कोकण विभागांमध्ये उष्णतेची मोठी लाट येणार असल्याचे , हवामान खात्यांकडून सुचित करण्यात आलेले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *