Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Pandharpuri Baffalo Gives 16 to 18 Liter Milk info ] : शेतकऱ्यांनो शेतीसोबत एखादा जोडधंदा करावा , जेणेकरुन शेतीच्या उत्पन्नापासून होणारे जोखीम काही अंशी कमी होते . यांमध्ये कुक्कुटपालन , दुधव्यवसाय , वराहपालन , शेळी पालन , मधुमक्षिका पालन अशा प्रकारचे अनेक शेतीला जोडधंदे आहेत .
यापैकी दुग्धव्यवसाय हा शेतीला परवडणारा जोडधंदा आहे . यांमध्ये दुध उत्पादनासाठी आपण जर पंढरपुरी जातीच्या म्हशींची निवड केल्यास , दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल , परिणामी शेतकऱ्यांस मोठा आर्थिक फायदा देखिल मिळेल . चला तर मग पंढरपुरी म्हशी विषयी जाणून घेवूयात सविस्तर माहिती ..
पंढरपुरी म्हशीची वैशिष्ट्ये : या जातीची म्हशी प्रामुख्याने सातारा , सांगली , कोल्हापुर , बेळगाव , सोलापुर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळते . या जातीच्या म्हशींचा चेहरा हा लांब व निमुळता असतो . तर विशेष म्हणजे या जातीच्या म्हशींचे शिंगे हे 45 सेमी ते 50 सेमी पर्यंत लांब वाढलेली असतात . या जातीच्या म्हशी ह्या देशभरांमध्ये पाळल्या जातात .
ह्या जातीच्या म्हशी ह्या एका दिवसाला 16 लिटर ते 18 लिटर पर्यंत दुध देते , यानुसार सध्याच्या दुधाच्या भावानुसार प्रति लिटर 70 रुपये प्रमाणे एका दिवसाला एक पंढरपुरी म्हशी ही 1120/- रुपये ते 1260/- रुपयांचा नफा मिळवून देईल .तर या जातीच्या म्हशी हलक्या व निकृष्ट चारावर देखिल तग धरुन राहू शकतात . तर या जातीच्या म्हशीचे वजन हे साधारणपणे 450/- किलो दरम्यान असते , या प्रकारच्या म्हशी लवकरच गाभण राहते , तर चांगली प्रजनन क्षमता यामुळे या जातीच्या म्हशी ह्या दुग्ध व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात निवडल्या जातात .
आजकाल तरुण वर्ग नोकरीपेक्षा दुग्धव्यवसाय , शेळीपालन , वराहपालन , कुक्कुटपालन अशा प्रकारच्या व्यवसायाकडे वळत आहेत . अशा प्रकारच्या व्यवसायाला सरकारकडून 45 टक्के पर्यंत अनुदानाचे कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिले जाते . यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय केलाच पाहिजे ..