Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Onion Export Export Permission ] : देशांमध्ये सध्या लोकसभा निवडणूकांची रणभुमाळी सुरु आहे , अशांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्यांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजगी कायम असताना , आता केंद्र सरकारने गुजरात मधून 2000 मेट्रिक अन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीस मंजूरी दिल्याने , महाराष्ट्र राज्यातील व्यापारी / शेतकरी वर्गांमध्ये मोठा संपात व्यक्त करण्यात येत आहेत .

विशेष म्हणजे हा कांदा राज्यातील मुंबई येथे स्थित JNPA बंदरातुन देखिल निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे . तर महाराष्ट्र राज्यातील कांद्यावर निर्यातीस दिनांक 08 डिसेंबर 2023 पासून बंदी कायम ठेवण्यात आलेली आहे . यामुळे राज्यातील कांद्यास भाव वाढण्यास सहाय्य होत नाहीत . यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहेत .

मागील आठवड्यांमध्ये केंद्र सरकारच्या या निर्णयामुळेच राज्यातील नाशिक , पुणे , अहमदनगर , जळगाव येथील शेतकऱ्यांनी संतप्त भुमिका घेवून काही दिवस कांदा बाजार समित्या बंद ठेवण्यात आलेल्या होत्या . असे असून देखिल केंद्र सरकारने दिनांक 25.04.2024 रोजी कृषी विभागांकडून केवळ गुजरात राज्यांमध्ये पिकणारा पांढरा कांद्याच्या निर्यातीसच परवानगी देण्यात आलेली आहे .

विशेष म्हणजे ही निर्यात NCL या सरकारी संस्था ऐवजी खाजगी निर्यातदारांच्या माध्यमातुन निर्यात करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे . अशा दुजाभाव करणाऱ्या निर्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी / व्यापारांवर अन्यात होत आहे .

या निर्णयाचे राज्यातील शेतकरी संघटनांकडून तिव्र विरोध दर्शविला आहे . तसेच राज्यातील देखिल कांदा निर्यातीस परवानगी न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *