Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra Avakali Rain Update ] : पुढील 48 तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . सध्या मराठवाडा , विदर्भाचा पावसाचा तडाका , पश्चिम महाराष्ट्र , कोकणाकडे वळला आहे .
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , राज्यांमध्ये आता अवकाळी पावसाचा जोर आता पश्चिम महाराष्ट्र व कोकण किनारपट्टीकडे वळला आहे . हवामन खात्याच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांमध्ये राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक , अहमदनगर , पुणे , सोलापुर , सांगली , सातारा तसेच खानदेशातील धुळे , नंदुरबार , जळगाव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .
तसेच कोकणाचा पारा अधिकचा चढला असून , उष्णतेमुळे दमट वातावरण अधिक पाहायला दिसून येत आहे . तर पश्चिम महाराष्ट्रातील पावसाच्या वातारावणाचा परिणाम म्हणून कोकणांमध्ये देखिल अवकाळी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . परंतु कोकणांमध्ये वादळाची संभावना पश्चिम महाराष्ट्रापेक्षा कमी असणार आहे . कोकणांमध्ये अवकाळी पावसाचे प्रमाणे कमी असते , परंतु या वर्षी अवकाळी पाऊस सर्वत्र थैमान घालत आहे .
याशिवाय मराठवाडा व विदर्भातील सर्वत्र ठिकाणी पावसाची स्थिती कायम असणार आहे . परंतु सद्य स्थितीत वादळी वाऱ्यांचे प्रमाणे कमी असणार आहेत . तर गारपिटीची संभावना कायम असणार आहे . यांमध्ये लातुर , यवतमाळ , नांदेड , बुलढाणा , अकोला , गोंदीया , वर्धा , अमरावती या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचे प्रमाण दिनांक 28.04.2024 पर्यंत असणार आहेत . यामुळे शेतकऱ्यांनी पुढील दिवसांसाठी शेतीमालाची तसेच पशुधनाची विशेष काळजी घेण्याच्या सुचना भारतीय हवामान खात्यांकडून देण्यात आलेले आहेत .
पुढील महिन्यात तापमानाची तिव्रता वाढणार : सध्या राज्याचे सर्वसाधारण तापमान हे 42 ते 44 अंश सेल्सिअस दरम्यान आहे , तर पुढील महिन्यांमध्ये तापमानाची तिव्रता अधिक होण्याची शक्यता आहे . राज्यातील मराठवाडा व विदर्भातील तापमान हे 50 अंश सेल्सिअस दरम्यान जाण्याची शक्यता हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेली आहे .