लोकसभा निवडणूका 2024 बाबत नियुक्ती अधिकारी / कर्मचाऱ्यांकरीता अत्यंत महत्वपुर्ण अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.22.04.2024

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Loksabha Election Duty Employee Update ] : लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक / पोट निवडणूकांच्या मतदानाच्या दिवशीच्या मतदान विषयक अहवालाबाबत मुख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामार्फत दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 20 एप्रिल 2024 रोजीच्या पत्रकानुसार , निवडणूकीच्या दिवशी त्याचबरोबर त्या लगतच्या आधीच्या व नंतरच्या दिवशी भारत निवडणूक आयोगाला मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सहीने पाठवावयाच्या प्रमाणपत्राचे मसूदे आयोगाने उपलब्ध करुन दिले आहेत . व त्याप्रमाणे आयोगास अहवाल पाठवावयाचे आहेत .

त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकरीता हस्त पुस्तिका – 2023 मधील परिच्छेद 13.65 येथे नमुद केल्या प्रमाणे मतदानाच्या दिवशी दुपारी 1.00 वाजता , संध्याकाळी 7.00 वाजता व दुसऱ्या दिवशी सकाळी 7.00 वाजता जोडपत्र 29 मध्ये सविस्तर अहवाल पाठवावयाचा आहे . त्या व्यतिरिक्त मतदार संघाकडून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास प्राप्त होणे आवश्यक असणार आहेत . त्या व्यतिरिक्त RVM – EVPAD संदर्भातील अहवाल सुद्ध विहीत विवरणपत्रात विहीत वेळेत सादर करणे आवश्यक असणार आहेत . सबब पुढील वेळापत्रकानुसार संबंधित निवडणक अधिकारी यांच्या सहीने अहवाल सादर करायचा आहे .

वरील वेळापत्रकानुसार सर्व संबंधित मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सहीने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास विहीत वेळांमध्ये पाठविणे आवश्यक असणार आहेत , या संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र यांच्या मार्फत दिनांक 22.04.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

परिपत्रक पाहा

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment