Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ women Employee National Holiday in MC Period ] : महिला कर्मचारी आजच्या युगांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावुन काम करीत असल्या तरी , त्यांच्या मासिक पाळी कालावधीमध्ये , त्यांना होणाऱ्या वेदना त्रासदायक असतात , तरी देखिल ते नियमित काम करीत असतात .

काही देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना या मासिक कालावधीमध्ये सुट्टीची तरतुद आहे , तीही भरपगारी . अशीच तरतुद भारतांमध्ये देखिल करण्याची मागणी आता महिला कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे . हा विषयावर महिला सार्वजनिक ठिकाणी बोलण्यास पसंत करीत नसल्या तरी , एका न्युज चॅनेलने केलेल्या सर्वेक्षणांमध्ये महिलांनी आपल्या व्यथा व्यक्त केलेल्या आहेत .

या सर्वेक्षणांमध्ये महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान भरपगारी राष्ट्रीय सुट्टी तसेच पुरुषांबरोबरीचे वेतनाची मागणी करण्यात आली आहे . कारण अनेक खाजगी क्षेत्रांमध्ये पुरुषांबरोबर वेतन महिलांना दिले जात नसल्याने , ही मागणी महिलांकडून करण्यात आली आहे . तसेच खाजगी क्षेत्रांमध्ये महिलांना प्रसूतीनंतर नोकरी गमवावी लागत असल्याचे दिसून आले आहेत .

सध्या देशांमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत , यांमध्ये कोणत्याही पक्षांने याबाबतच्या मुद्द्यावर जाहीरनामा प्रसिद्ध केला नसल्याची खंत महिलांकडून व्यक्त केली जात आहे .देशातील केंद्र सरकार अधिनस्थ महिला कर्मचाऱ्यांकडून मासिक पाळी दरम्यान भरपगारी राष्ट्रीय सुट्टी मोठी मागणी होत आहे .

तसेच असंघटित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांना देखिल भरपगारी वेतन / मजुर अदा करण्याबाबतची योजना तयार करण्याची मागणी महिलांकडून करण्यात येत आहे . जसे कि , मासेमारी व्यवसाय करणाऱ्या , उसतोड काम करणाऱ्या , मनरेगा मध्ये काम करणाऱ्या , खाजगी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या अशा असंघटित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांना ( विशेषत : कष्टाचे काम करणाऱ्यांना ) सदर मासिक पाळी कालावधीमध्ये सुट्टी घेण्याकरीता आर्थिक मोबदला मिळण्याची मागणी केली जात आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *