Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State 11 District Raild Alert For Avakali Rain ] : राज्यांमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे . या कालावधीत राज्याचा तापमान मोठ्या प्रमाणात वाढला असून , गारपीट मोठ्या प्रमाणात होत आहे .
राज्यातील तापमानाचा पारा हा 42 ते 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला असून , राज्यातील वातावरण ढगाळ पाहायला मिळत आहे . तापमानाचा पारा वाढल्याने , बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहेत . या कालावधी मध्ये राज्यातील विदर्भ तसेच मराठवाडा विभागांमध्ये हवामान उष्ण व दमट असणार आहे . तर नुकतेच हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यांमध्ये दिनांक 28 एप्रिल 2024 पर्यंत खाली नमुद करण्यात आलेल्या 11 जिल्ह्यांसाठी वादळी पावसासह गारपीटीमुळे चिंताजनक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .
राज्यतील मराठवाडा , पश्चिम विदर्भ भागांमध्ये समुद्र सपाटीपाच्या उंचीपासून चक्क 1.5 कि.मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती निमार्ण झालेली आहे . या हवेचा दाब छत्तीसगड , कर्नाटक , केरळ पर्यंत सक्रिय झलेला आहे . यामुळेच राज्यात अवकाळी पाऊस होत आहे . हवामान खात्याने सदर वाऱ्यांची स्थिती तयार झाल्याने , शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
नेमके कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस : यांमध्ये विदर्भातील यवतमाळ ,भंडारा , गोंदिया , गडचिरोली , वर्धा , नागपुर , वाशिम , चंद्रपुर या जिल्ह्यांमध्ये 28 एप्रिल पर्यंत तुफान गारपीटीची शक्यता आहे , त्याचबरोबर मराठवाड्यातील लातुर व धाराशिव तसेच मध्य महाराष्ट्र मधील सोलापुर ..
या 11 जिल्ह्यांमध्ये दिनांक 28 एप्रिल पर्यंत मोठ्या प्रमाणात गारपीटीसह वादळी/ अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असणार आहे .