Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Pay Issues Shasan Nirnay ] : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी निवारण समिती 2024 च्या कामकाजाबाबत सामान्य प्रशासन विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार , दिनांक 16 मार्च 2024 नुसार सातव्या वेतन आयोगातील त्रुटींबाबत , विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करुन त्याबाबत शिफारशी करण्याकरीता वेतनत्रुटी निवारण समिती 2024 ची स्थापना करण्यात आली असून समितीस स्थापनेच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करावयाचा आहे .
त्यामुळे वेतनत्रुटी निवारण समिती 2024 च्या कामकाजासाठी श्रीम.अश्विनी मोहन लांभाते सहायक कक्ष अधिकारी , श्री.प्रदिप दिगंबर रेडकर सहायक कक्ष अधिकारी , श्री.निखिल सं.रोकडे लिपिक – टंकलेखक या कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित करुन उपलब्ध करुन देण्यात येत आहेत .
सदर कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या वेतनत्रुटी निवारण समिती , 2024 च्या कामकाजासाठी सहा महिने अथवा समिती आपला अहवाल शासनास सादर करणेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहीत करण्यात येत आहेत . सदर नमुद कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहीत करण्यात येणार असल्याने , त्यांच्या वेतनादी विषयक बाबी संबंधित कर्मचारी ज्या विभागात सध्या कार्यरत आहेत , त्या विभागाकडून हाताळण्यात येतील .
या संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.