Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ BJP Expected Seats Update ] : दिनांक 19 एप्रिल 2024 पासुन देशात लोकसभा निवडणूकासाठी सुरु झालेल्या आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणूकांच्या रिंगणात उतरले आहेत .
मागील दोन्ही टर्म भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक बहुमत मिळाले आहे , परंतु यंदाच्या वेळी बहुमत मिळेल , परंतु जागांचा आकडा कमी होऊ शकतो , असे तज्ञांचे मत आहे . अर्थतज्ञ सुरजित भल्ला यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले कि , भारतीय जनता पक्षाला 2019 निवडणूकांमध्ये मिळालेल्या यशापेक्षा यंदा जागेमध्ये 7 टक्के पर्यंत वाढ होईल , तर यंदाच्या वर्षी भाजपाला चांगले यश मिळेल अशी शक्यता व्यक्त केली आहे .
तर संख्याबळाचा विचार केला असता , भारतीय जनता पक्षाला लोकसभेत 330 ते 350 जागा मिळतील , यांमध्ये त्यांच्या सहयोगी पक्षांचा आकडा वेगळा असेल , म्हणजेच भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेसाठी संपुर्ण बहुमत मिळू शकेल . तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला 44 जागांवर यश मिळवता येईल , जे कि सन 2019 च्या जागांपेक्षा कमी असेल . अशा प्रकारचे मत अर्थतज्ञ सुरजित भल्ला यांनी एका मुलाखतीदरम्यान व्यक्त केला आहे .
जनतेचा कौल : जनतेचा कौल पाहिला असता , उत्तर प्रदेश , बिहार ,उत्तराखंड , राजस्थान , मध्य प्रदेश राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठे यश मिळू शकते . तर महाराष्ट्र राज्याचा विचार केला असता , राज्यांमध्ये काही पक्षांतील फुटीमुळे नेमका कोणत्या पक्षाला फायदा होईल , हे सांगता येणार नाही . उत्तरीय भारतांमध्ये उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ यांनी राज्यात मोठ्या सुविधा घडवून आणल्या आहेत . यामुळे उत्तर प्रदेश मध्ये सर्वाधिक फायदा भाजपाला होईल .
शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये विद्यमान सरकारप्रति नाराजगी : राज्यांमध्ये दुष्काळी भाग म्हणून मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश होतो , या भागांमध्ये फक्त खरीप पिकेच घेतली जातात , ज्यांमध्ये सोयाबीनचा समावेश आहे . तर यंदाच्या वर्षी सोयाबीनला भाव मिळत नसल्याने , शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजगी आहे , तसेच पश्चिम महाराष्ट्रांमध्ये कांद्याचे सर्वाधिक उत्पादन होते , कांदा निर्यातबंदीमुळे कांद्याला देखिल भाव मिळत नाही , यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी देखिल विद्यमान केंद्र सरकारवर नाराज आहेत .