Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Panjabrav Dakh New havaman andaj News ] : राज्यातील हवामान दिवसेंदिवस बदलता चालले आहे , मागील आठवड्यांपासून पावसाबरोबर वादळी- वाऱ्यांचे थैमान सुरु झाले आहेत . राज्यातील विविध ठिकाणी वादळ – तसेच वाऱ्यांमुळे शेतीमाल तसेच इतर जंगम संपत्तीचे नुकसान होताना दिसून येत आहेत .

राज्यातील विदर्भ , मराठवाडा मध्ये तापमानाचे प्रमाणे सर्वाधिक आहे , तर पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागात थोडेसे उन्हाचे प्रमाण कमी आहे . हवामान तज्ञ पंजाबरावांनी दिनांक 20 एप्रिल रोजी नविन हवामान अंदाज जारी केला आहे , यांमध्ये त्यांनी सांगितले कि , दिनांक 28 एप्रिल 2024 पर्यंत राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे .

यांमध्ये प्रामुख्याने दिनांक 28 एप्रिल पर्यंत राज्यातील मध्य महाराष्ट्र , विदर्भ , मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडणार आहे . तर राज्यातील जालना , नांदेड , सोलापुर , पुणे , नगर , धाराशिव , लातुर , परभणी ,हिंगोली , यवतमाळ , सातारा , सांगली या जिल्ह्यांमध्ये वादळी – वाऱ्यांसह पावसाची मोठी शक्यता वर्तविण्यात आली आहे . यामुळे सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याने , शेतकऱ्यांने पुर्वनियोजन करणे सोयीस्कर ठरेल .

भारतीय हवामान खात्याकडून छ.संभाजीनगर , सातारा , सोलापुर , नगर , नाशिक , जळगाव , लातुर , नांदेड , यवतमाळ , धाराशिव , बीड , लातुर , गडचिरोली , कोल्हापुर या जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे .

तापमानांमध्ये मोठी वाढ : अकोला व लातुर 44.00 अंश सेल्सिअस , जळगाव 43.2 , अमरावती 42.80 , धुळे 42.5 , यवतमाळ 42.5 , चंद्रपुर 43.8 , वाशिम – 43.6 अंश सेल्सिअस इतके तापमानाचा पारा चढला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *