Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee DA , New NPS System , HRA Update News ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ , डी.ए वाढ फरक तसेच सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व वाढीव घरभाडे भत्ता संदर्भात संक्षिप्त अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
आचसंहिता मुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचा वाढीव डी.ए रखडला आहे . माहे जानेवारी 2024 रोजीचा डी.ए लाभ आता राज्यातील कर्मचाऱ्यांना जुन महिन्यापर्यंत लांबणार आहे . जुन महिन्यात राज्यातील निवडणूक प्रक्रिया पुर्ण होणार आहे , त्यानंतरच डी.ए वाढीचा निर्णय होईल , म्हणजेच डी.ए वाढ बाबतचा अधिकृत्त निर्णय जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यानंतर लागु करण्यात येईल .
यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना 4 टक्के डी.ए वाढीचा लाभ हा माहे जानेवारी पेड इन जुलै महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत अदा केला जाईल . यांमध्ये जानेवारी महिन्यांपासूनच्या डी.ए फरकाची रक्कम देखिल अदा करण्यात येईल . म्हणजेच राज्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यांपासून 4 टक्के डी.ए वाढीमुळे एकुण 50 टक्के दराने डी.ए वाढीचा लाभ मिळेल .
सुधारित वाढीव घरभाडे भत्ता : सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा लाभ हा घरभाडे भत्ताचा मिळणार आहे . सध्याला वास्तव्याच्या ठिकाणानुसार 9 टक्के , 18 टक्के व 27 टक्के इतका घरभाडे भत्ता ( महागाई भत्ता 25 टक्के पेक्षा पार झाल्यानंतर लागु करण्यात आला होता ) मिळतो , तर वेतन आयोगानुसार , डी.ए चे 50 टक्यांपेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्तांमध्ये वाढ करण्यात येणार आहे .
म्हणजेच जुलै 2024 मध्ये डी.ए मध्ये 3 टक्के जरी वाढ झाली तर एकुण डी.ए 53 टक्के होईल , म्हणजेच डी.ए चे दर 50 टक्केचा आकडा पार करेल .म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव दराने घरभाडे भत्ता लागु करण्यात येईल , म्हणजेच वास्तव्याच्या ठिकाणानुसार 10 टक्के , 20 टक्के , 30 टक्के अशी वाढ लागु करण्यात येईल .
सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना : सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे लाभ लागु करण्यात येतील , परंतु यांमध्ये NPS मधील कर्मचाऱ्यांचे योगदार कायम असेल , जे कि कर्मचाऱ्यांना ना परतावा असेल . या संदर्भात अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित केला नसल्याने , कर्मचाऱ्यांमधील संभ्रम कायम आहे . याबाबत अधिकृत्त निर्णय माहे नोव्हेंबर महिन्यांच्या पुर्वीच होईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.